Wednesday 19 September 2012


वांग्याची भाजी



कोल्हापूर आणि अथणी येथे मिळणारी गडद जांभूळ रंगाची छोट्या लांबट आकाराच्या  वांगीचा स्वाद घ्यायचा ज्यांना भ्याग्य लाभले त्यानांच ''रुचकर वांगी चा " खरा अर्थ माहित असला पाहिजे. आता वांगी ही भाजी खुपश्या लोकांना आवडत नाहीं ही गोष्ट ही वेगळी. पण ज्यांना आवडतात ते ही भाजी बारा महिने तेरा काळ खावू शकतील ह्याची मी १००% खात्री देवू शकेन. बरीच वर्षे अशी वांगी मला कुठे मिळाली नव्हती. परंतु,  काही  दिवसा पूर्वी, अचानक लु लु सुपर मार्केट मध्ये अशी ही दुर्मिळ वांगी दिसली आणि मी त्याच्यावर एकदम अधाशी पणाने तुटून पडले. मनसोक्त मजेत एकेक वांग वेचून घेतलं आणि  दुसऱ्या दिवशीच मस्त पैकी जपून सावरून , मोजून मापून, देवाचं नाव घेत अगदी मन लावून, आनंदात मनापासून त्याची मसालेदार भाजी बनवली. बनवताना तोंडाच्या रुची ग्रंथींना सुटलेल्या पाण्याचे वर्णन न केलेलेच बरे !! जेवणात पहिला घास खाल्याबरोबर नवऱ्याने केलेली स्तुती मी माझ्या आख्ख्या जन्मात कधीही विसरू शकणार नाहीं..."आजची ही वांग्याची भाजी खावून मला माझ्या आज्जीची आठवण झाली. तिच्या हाताची चव सुद्धा अशीच असायची. मस्त झाली आहे भाजी." आनंदची आज्जी ह्या एक उदात्त व्यक्तिमत्वाचा कळस होता. सर्वांवर प्रेम कसे करावे हे कोणीही त्यांच्या कडून शिकावे. माझ्या मते त्या चालत्या बोलत्या देवी सारख्या होत्या. अशा ह्या महान व्यक्तीशी काहीना काही कारणासाठी का होईना आपली तुलना झाली, हे कळून जीवनाचे सार्थक झाल्या सारखे वाटले. 

थोडया  वेळाने, नवऱ्याने विचारले, "ही वांगी आपण परवा लु लु सुपर मार्केट मधून आणली तीच ना? " मी म्हटले , "हो, का?". नवरा , " वांगी चवीला एकदम मस्त आहेत. भाजी मस्त झाली आहे. " त्यांचे म्हणणे पण खरेच होते. मी म्हटले, " वांगी मस्त आहेत, मसाल्याचे सामान सुद्धा बरोबर पडले आहे आणि मुख्य म्हणजे मी अगदी मन लावून भाजी केली आहे." त्या नंतर दोन-तीन दिवसांनी मी आलू पराठे केले. मन लावून , मस्त मसाला घालून चविष्ट पराठे नवऱ्याला आवडले. त्यांनी विचारले," असे कसे एकदम खुसखुशीत आणि टेस्टी झाले आहेत पराठे आज? " मी म्हटले, " मला पण माहित नाहीं. कदाचित बटाटे चवीला एकदम मस्त असतील !!!!!" ........(नवरा काहीही बोलला तरी त्याचा अर्थ बायको बरोबर उलटा  काढते , ह्याची खात्री पटली ना तुम्हाला?) 

आज आपण सारे श्री गणेशभक्त भारतातील प्रमुख २१ गणेश स्थाने आणि त्यांची स्थापना कोणी केली ते पाहणार आहोत. 

पुराणोक्त २१ प्रमुख गणेश स्थाने आणि त्याची स्थापना करणारे : - 

१ प्रयाग -ओंकारेश्वर (वेद व ओम कार द्वारा स्थापित) 
२ गंगा मसले-भालचंद्र (चंद्र द्वारा स्थापित) 
३ थेऊर -चिंतामणी (ब्रह्मद्वारा स्थापित)
४ राक्षसंभुवन -विज्ञान गणेश (दत्तात्रय स्थापित) 
५ सिद्धटेक -सिद्धिविनायक (विष्णुद्वारा स्थापित) 
६ काश्मीर - महोत्कट (कश्यप द्वारा स्थापित) 
७ विजयपुरी- विघ्नराज (माहिती उपलब्ध नाहि)
८ कुंभकोणं-श्वेत गणेश (समुद्र मंथन वेळी) 
९ नामलगाव -आशापुरक गणेश (यम द्वारा स्थापित) 
१० आधासा -अदोष क्षेत्र शमी विन्घेश (देव व ऋषी द्वारा स्थापित) 
११ गणेशपूर - गणेश बंगाल 
१२ रांजणगाव महागणपती (शंकर द्वारा स्थापित) 
१३ पारीनेर मंगल मूर्ती (मंगल ग्रह द्वारा स्थापित)
१४ पद्मालय- प्रवाळ गणेश व धरणीधर गणेश (दत्तभक्त सहस्त्रार्जुन आणि शेष)
१५ पाली-बल्लाळेश्वर (भक्त बल्लाळ स्थापित, मूळ स्थान सिंध प्रदेशात होते )
१६ कदंबपूर- चिंतामणी (इंद्र स्थापित) 
१७ लेण्याद्री-गिरीजात्मज (पार्वती स्थापित)
१८ काशी- ढूंढीराज 
१९ वेरूळ-लक्षविनायक (स्कंद स्थापित) 
२० राजूर- महागणपती (वरण्य राजा स्थापित)
२१ मोरगाव-मयुरेश्वर (पाच देवांनी स्थापित) 

|| गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया || 



No comments:

Post a Comment