Tuesday 12 November 2013

दोन मुंग्या
 


 
आलं घालून मस्त पैकी उकळवलेला दुपारचा चहा पीता पीता समोरच्या भिंतीवर लक्ष गेले. दोन मुंग्या , एक अंगाने स्थूल आणि तर  दुसरी एकदम नाजूक, हातात हात घालून त्या  भल्या मोठ्या  भिंतीवर तुरुतुरु चालल्या होत्या. जणू काही अगदी पार छता पर्यंत जावून पोहचण्याचा त्यांचा इरादा असावा असे भासले. काय ठरवून त्या वर चढत होत्या ह्याची देवालासुद्धा कल्पना नसावी. जोडी जोडी ने चालण्याच्या त्यांच्या त्या बेमालून लकबी कडे पाहिल्यावर मला वाटले कि दोन जीवनसाथीच मनात कुठलीतरी आशा ठेवून चढत आहेत. खरंच आयुष्यात सर्व प्रकारच्या वळणावर कुणीतरी साथीदार बरोबर असल्यावर रणरणत्या  उन्हात सुद्धा गोड, स्वच्छ, मृदुल, थंड चांदण्याचा भास होतो आणि असे वाटते कि हा प्रवास कधी संपूच नये. 
 
बराच वेळ दोन्ही मुंग्या जोडीने चालल्या होत्या. जवळ जवळ अर्धी भिंत त्यांनी पार केली होती. तुरुतुरु चालत जोडीने घालविलेल्या त्या क्षणाची  आठवण त्यांना लक्षात राहील काय, ह्या प्रश्नांचे उत्तर मी शोधत होते. मनात कुठेतरी स्वतःच्या आयुष्यात सुद्धा अशा प्रकारे एकत्र  घालविलेल्या बऱ्याच सुखद आणि थोड्याश्या दुखःद  आठवणीत मन रंगून गेले  होते. परत जेंव्हा भिंतीवर लक्ष गेले तेंव्हा माझ्या हृदयाचा एक ठोकाच चुकल्या सारखे वाटले. जोडी जोडीने इतका वेळ एकत्र क्रमण  करणाऱ्या त्या मुंग्या आता एकमेकांपासून अलग झाल्या होत्या. स्थूल शरीराच्या मुंगीला मागे सोडून दुसरी नाजूक आणि चपळ मुंगी पुढे निघून गेली होती. असे  वाटले कि ह्या दोन मुंग्या जोडीदार नसाव्यात. बहुतेक पालक आणि तिचे अपत्य असावे. वय झाल्यावर स्थूल झालेल्या त्या मुंगीला स्वतःच्या उमेदीच्या वयात असलेल्या लेकरूच्या बरोबर चालण्याचे उसने बळ आणण्यास बहुतेक कष्ट होत असावेत. वयोमाना प्रमाणे पालकाच्या  मंदावलेल्या चालीची  अभ्रकाला जाणीव कदाचित जाणीव नसावी. पण  ह्याचा अर्थ असा नव्हें कि त्याने मागे वळून  आपल्या  पालका कडे कधी पाहूच नये. ती जाड मुंगी भरभर चालण्याचा प्रामाणिक पणे  प्रयत्न करत होती. पोटच्या गोळ्याबरोबर पावलावर पावूल टाकून मार्ग क्रमण करण्यास ती आतुर होती  आणि जीवापाड प्रयन्त ही  करीत असावी. शरीर साथ देत नसतांना सुद्धा वेड्या आशेवर पुढे पुढे जायच्या ऐवजी ती मागेच जास्त रहात होती. तिची  असहाय्य  स्थिती आणि धडपड पाहून डोळे पाणावले आणि जीवनातल्या ह्या घोर आणि क्रूर सत्याची  नकळत जाणीव झाली. ह्याच वेळेत, भर योव्वनात असलेली  ती दुसरी मुंगी जीवनाचा आनंद लुटत खूप  दूर निघून गेली होती. ना तिला वेळेच भान ना तिला स्वतःच्या पालकाची आठवण !!! आपण पण एक दिवस असेच असहाय्य स्थितीला पोहोचणार आहोत ह्याची तिला जर सुद्धा कल्पना नसावी. जाणीव जर असती तर तिने एकदा तरी मागे वळून नक्कीच पाहिले असते, नाही का? दुसरीकडे वयस्कर मुंगीच्या नशिबाने वेगळीच पलटी मारली होती. बरेच  श्रमिक प्रयन्त करून सुद्धा तिच्या पदरी अपयशच आले होते. दैवाने तिला साथ दिली नव्हती. मनात असलेल्या उमंगाना न जुमानता तिच्या पावलांनी माघार घेतली होती. भिंतीवरून कोसळून ती थेट जमिनीवर पडली होती. परत भिंतीवरचा मार्ग सामोरा घालून चालत जाण्या इतकी तिच्यात शक्ती नसावी. बराच वेळ ती तशीच निपचित होवून जमिनीवर पडली होती. तिच्या त्या दैन्यवाणी स्थितीची आणखीन थोडा वेळ निरीक्षण करत उभे राहण्याचे धैर्य माझ्यात नव्हते.मनाला झालेल्या वेदनांना लपवत तिच्या नकळत मी तेथून हळूच पाय काढता घेतला. जीवनाच्या ह्या अघोर सत्याला कोण टाळू शकेल काय ? का मग आपण उगीचच खोटी आशा उराला कवटाळून बसलेलो असतो ? ह्या जगात कुणी कुणाच नाही , हे माहित असतांना सुद्धा का आपण खोटी नाती-गोती सांभाळण्याचा खटाटोप करत असतो? ह्या प्रश्नांचे उत्तर माहित असतांना सुद्धा का ह्या जाळ्यात सर्वजण आपणहून  अडकतात ? हे सर्वकाही भगवंताच्या इच्छेनुसार होत असते का ?
 
नेहमीप्रमाणे मन अशा अनेक प्रश्नांच्या भोवऱ्यात गटांगळ्या खात असतांना लक्षात आले की ती स्थूल देहाची मुंगी हळूच उठून हेलकावे खात खात पुन्हा एकदा आशेच्या जोरावर चालू लागली होती. देईल  का कुणी साथ तिला, तिच्या उरलेल्या मार्गक्रमणावर ?  

Sunday 23 June 2013

एक जोक … कि एक भेसूर सत्य !!!
 


घराजवळच असलेले "सुख-सागर" उपाहारगृह  हे आम्हा दोघांचेही आवडीचे !! शुद्ध शाकाहारी आहे म्हणून नव्हे तर पांचच मिनिटाच्या अंतरावर आहे म्हणून !! वाढत्या वयोमानाप्रमाणे हल्ली भूकही बरीच कमी झाली आहे. खाण्यासाठी न जगता , जगण्यासाठी खायचे दिवस एव्हडे लवकर आमच्या जीवनात येतील याची आम्हाला तसुमात्र कल्पना नव्हती. परंतु जे झाले ते बऱ्या साठीच झाले म्हणले पहिजे. नाहीतर ह्या दुबई मध्ये बारीक आकाराची बायको ढब्बू आणि गोलाकार व्हायला एक महिन्याची पण उसंत लागत नाही .

तर अशा या सुख सागरात आम्ही काल  मजेत डुबकी मारायला गेलो होतो. थोड्याच वेळात आमच्या शेजारच्या टेबलावर एक सुंदरसा दोन हृदयं एकमेकांना चिकटून असलेला गुलाबी रंगाचा केक आणून ठेवला. तो केक बघून आमच्या मनात उगीचच गुदगुदल्या झाल्या. मी माझ्या साथीला म्हंटल ," कोणाची wedding anniversary आहे वाटते. मोठ्ठी पार्टी फेकणार असे दिसतेय ". जवळजवळ दहा - पंधरा मिनिटे तो केक तसाच उघड्यावर पडला होता . त्याच्यावर माशी किंवा झुरळ बसेल कि काय अशी मला भीती वाटत होती . मी अगदी एक चित्ताने त्याच्या वर नजर खिळवून बसले होते. अचानक वेटरनी तो केक परत डब्ब्यात भरला आणि एका माणसाच्या हातात कोंबला. हे सर्व इतके भरभर घडले कि आम्ही  दोघेही तोंड आssss करून बघत बसलो.

मी माझ्या पतीदेवाला म्हंटले,"बहुतेक त्यांचा ग्रुप मोठा असावा आणि त्यांची इथे बसायची व्यवस्था बरोबर झाली नसेल. ते दुसरी कडे कुठे तरी गेले असतील." ह्यावर माझ्या हजरजवाबी नवऱ्याने काढलेले उद्गार अगदी कौतुक करण्यासारखे आहेत. ते म्हणाले ," नाही तसे काही झाले नसेल. मला वाटते, केक कापण्याच्या अगोदरच त्या दोघांचा घटस्फोट  झाला असण्याची जास्त शक्यता आहे. हल्ली नाती बनवायला आणि मोडायला पाच मिनिटे सुद्धा लागत नाहीत. काळाच्या ओघात सगळेच बदलत आहे." त्यांचे हे  विश्लेषण ऐकून मन सूंद झाले.

खरंच, किती भेसूर सत्य त्या वाक्यात लपलेले होते. नाती जपण्यात जी एकप्रकारची मनाची मृदुलता , सहिष्णुता,  अध्वरता लागते ती हल्ली कुठे हरवून गेली आहे कोणास ठावूक ? प्रत्येक जण आपलेच खरे आणि श्रेष्ठ म्हणतो . Compatibilityच्या नावाखाली अगदी मनाला येईल तसे वागण्याचा प्रयन्त हल्लीची पिढी करत आहे. "मी आणि माझे" ह्या पलीकडे कोणाला काही दिसेनासेच झाले आहे. अशा ह्या जगात भगवंताच्या अनुसंधानात राहुन परमार्थ करण्याची रीत तर आता स्वप्नात सुद्धा जमणार नाही. कुठले प्रेम, कुठली आपुलकी, कुठला दिलासा, कोण कुणाचा …संपूर्ण घडीच बिघडली आहे. हातात काठी धरून जीवन समाधानाने जगू म्हणणाऱ्याच्या नशिबात आता हात पण परका झाला आहे आणि काठीचा तर कुठे सुगावाच लागत नाही आहे…. काय हा परकेपणा !!!!     

Monday 3 June 2013

सत्संगती 


श्वासोच्छ्वासी नाम | जपे सर्व काळी | वारी ती आगळी | साधे ज्याला ||
न लगे जावया | कुठे पुण्यक्षेत्री | अवघी धरित्री | तीर्थरूप ||
व्यापूनिया चित्ती | नित्य समाधान | वाटे धन मान | तृणवत ||
अंतरी संतत | ध्यातो भगवंत | होय मूर्तिमंत | संत भला ||
लाभावी अशाची | नित्यचि संगती | याविण विनंती | नाही दुजी ||
(श्री तुकोबारायांचरणी सादर समर्पण)

सत्संगती म्हणजे चांगल्या लोकांत मिळून मिसळून राहणे. श्रेष्ठ लोकांच्या सहवासात असणार्‍या व्यक्तीमध्ये चांगले गुण येतात व ते विकसित होतात. आपल्यापेक्षा अधिक योग्य, गुणी, बुद्धिमान विद्वानांच्या सहवासाला सत्संगती म्हणतात.याउलट अयोग्य, गुणहीन,मूर्ख व्यक्तीचा सहवास म्हणजेच कुसंगती होय. सभोवतालच्या वातावरणातून मनुष्य बरेच काही शिकतो. जर त्याला चांगली संगत मिळाली तर त्याचा निरंतर विकास होत राहतो. विनोभा भावे म्हणतात, 

सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो |
कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडो॥

अशीच सत्संगती मला, देवाच्या कृपेने, गेले ५ वर्षे अगदी सतत आणि प्रकर्षाने मिळाली आहे. जीवनाच्या साथीदाराबरोबर अगदी मनापसून उत्तेजित होवून, उल्हासाने, स्थिरतेने, समाधानाने, आनंदाने घालविलेली ही ५ वर्षे माझ्या नशिबात आली आणि मी ती पूर्णपणे चोखंदळू शकले, हे देवाच्या कृपेशिवाय आणि थोरामोठ्यांच्या  आशीर्वादाशिवाय कसे साध्य होईल ? दररोज किमान एक तास तरी काहीतरी चांगले  वाचण्याचा परिपाठ आम्ही एकत्र गेली पाच वर्षे करत आहोत. पुढे पण हा परिपाठ चालू ठेवण्यास देव आम्हाला समतोल बुद्धी देवो, अशी देवाकडे प्रार्थना !!!

दररोज संध्याकाळी, "THE HOLY GEETA" by स्वामी चिन्मयानंद , श्री. प्र. ह. कुलकर्णी यांचे  "मनोबोधामृत" , साने गुरुजींचे "श्यामची आई ", श्री समर्थ सद्गुरु ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज यांची "प्रवचने" ह्या अशा सुलभ सुंदर, सहज आकलन होण्याऱ्या दिव्य पुस्तकांचे वाचन आणि सोबतीला माझ्याशी एकरस होवून वाचलेले ऐकणारा आणि ऐकाविणारा असा माझा थोर साथीदार …… सत्संगतीचा अर्थ ह्याशिवाय वेगळा काय बरे असू शकेल? 

Saturday 1 June 2013

काय बरोबर आहे ना ?…. !!!


फेसबुकवर वाचलेल्या ह्या पोस्टचे कौतुक करावे तेव्हढे कमी !!! परंतु आपली गत "कळते पण वळत नाहीं " अशातली आहे. आपण कधी सुधारणार, ह्याची हल्लीच्या तरुणांना थोडी तरी चिंता आहे काय, ह्याबद्दल फक्त देवालाच ठावूक !! पण गड्यानो , एक लक्षात ठेवा, "भगवान के घर में देर है लेकिन अंधेर नाही हैं " मग काय देवाकडून लाठीचा मार पडायच्या अगोदर सुधारणार ना ? नाही तर तुम्ही आणि तुमचे फुटके नशीब …!! 


थोडे प्रदीर्घ.... पण फार महत्वाचे
********************

प्रिया मित्रानो, लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख वाचवा आणि आणि कुठेतरी सांभाळून सेव्ह करून ठेवा परत वाचण्यासाठी.....:

'बायको नोकरी करणारी असावी, ती स्मार्ट असावी, चारचौघींत उठून दिसावी' अशी तमाम नवरेमंडळींची इच्छा असते. यासोबत तिने 'गृहकृत्यदक्ष' आणि 'आदर्श सून' असणंही मस्ट असतं. पण, तीही आपल्यासारखी एक माणूस आहे. तिच्या भावभावना, इच्छा-आकांक्षा, तिची परिस्थिती कशी असू शकते, याकडे मात्र या नवरेलोकांचं दुर्लक्ष होतं, नवऱ्याचा बायकोकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असावा...

-  उद्या कदाचित तुझं नोकरी करणाऱ्या मुलीशी लग्न होईल, त्यावेळी जरा हे वास्तवही लक्षात घे.
-  ती तुझ्याएवढीच शिकलेली असेल, तुझ्याएवढाच पगार कमावत असेल.
-  तीदेखील तुझ्यासारखीच व्यक्ती असेल, त्यामुळे तिचीही स्वप्नं असतील, आवडी असतील,
- तिनेही आतापर्यंत कधीच किचनमध्ये पाऊल टाकलं नसेल, अगदी तुझ्यासारखंच किंवा तुझ्या     
   बहिणीसारखं..
- तीसुद्धा अभ्यासात बिझी असेल आणि मुलगी म्हणून कसलीही सवलत न देणाऱ्या या स्पधेर्च्या युगात पुढे
  जाण्यासाठी धडपडत असेल, अगदी तुझ्यासारखीच!
- तिनेही तुझ्याप्रमाणेच वयाची २०-२५ वर्षं आई, बाबा, बहीण, भाऊ यांच्या प्रेमाच्या सान्निध्यात घालवली 
  असतील,
- आणि तरीही हे सारं मागे सोडून, तिचं घर, प्रेमाची माणसं यांना दूर करून ती तुझं घरं, तुझं कुटुंब, तुमच्या 
  रितीभाती स्वीकारायला आली असेल.
- पहिल्याच दिवशी तिने मास्टर शेफप्रमाणे स्वयंपाक करावा अशी सगळ्यांची अपेक्षा असेल
- नेहमीच्या बेडवर तुम्ही डाराडूर झोपलेले असताना ती मात्र सर्वस्वी अनोळख्या असलेल्या वातावरणाशी, 
  अनुभवांशी आणि किचनशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असेल.
- सकाळी उठल्याबरोबर तिने चहाचा कप हातात द्यावा आणि रात्रीचं जेवणही तिच्याच हातचं असावं अशी 
  अपेक्षा असेल,
- तिलाही ऑफिसच्या कामाच्या डेडलाइन पाळताना उशीर होत असेल,
- तीसुद्धा कंटाळली असेल, कदाचित तुमच्यापेक्षा थोडी जास्तच, तरीही तिने तक्रारीचा सूर लावू नये असंच 
   तुम्ही म्हणाल.
- नोकर, स्वयंपाकी, बायको, यापैकी तिला एखादी भूमिका करायची नसली तरीही आणि त्यातही तुमच्या 
  तिच्याकडून काय अपेक्षा आहेत हेदेखील शिकण्याचा ती प्रयत्न करत राहील...
- तीसुद्धा थकते, कंटाळते पण सतत टुमणं लावू नये आणि तुझ्यापेक्षा पुढे जाऊ नये या अपेक्षाही तिला 
  माहिती असतात.
- तिचा स्वत:चा कंपू असतो, त्यात मित्रंही असतात आणि तिच्या ऑफिसमधले पुरुष सहकारीही तरीही ईर्ष्या,        अनावश्यक स्पर्धा आणि असुरक्षिततेच्या भावनेने तुमच्या मनात घर करू नये म्हणून ती बालमित्रांपासूनही  दूर राहते.
- कदाचित तिलाही लेट नाइट पाटीर्त जायला, धमाल करायला आवडत असेल, पण तुम्हाला आवडणार नाही 
  म्हणून तू सांगितलेलं नसतानाही ती तसं करत नाही.

मित्रानो, आपल्या या अनोळखी घरात केवळ आपण एकच तिच्या ओळखीचा, जवळचा असतो, त्यामुळे आपली मदत, संवेदना आणि सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे अण्डरस्टॅण्डिंग आणि प्रेम मिळावं अशी तिची अपेक्षा असेल पण अनेक जण हे समजूनच घेत नाहीत...

एक सांगू, स्वत:कडून पूर्ण प्रयत्न करून ती हे नातं सुंदर करेल, तुम्ही मदत केली आणि विश्वास ठेवला तर हे नातं जीवनातलं सर्वाधिक यशस्वी शिखर गाठू शकेल..

काय बरोबर आहे ना ?…. !!! पटलं असेल तर चला पटापट कामाला लागा पाहू !!!!

Monday 22 April 2013


आधुनिक काळातील श्यामची आई ......


"श्यामची आई" हे पुस्तक वाचतांना  कित्येक वेळा डोळ्यातल्या अश्रूंना अखंड वाहू देण्यानेच मनाला समाधान व्हायचे. वाटायचे असेच कायमचे ह्या महान आईच्या जीवनातील प्रवासात गुंतून राहावे आणि तिच्या प्रेमाने भरलेल्या वात्स्ल्याच्या नेत्रांच्या दृष्टीमधून आपल्या स्वतःच्या जीवनात डोकावून पाहावे. परंतु, तसे करण्याचे धैर्य अजून पर्यंत झाले नाही.

परवा सहज इंटरनेट वर browse करत असतांना (browse चा मराठी अर्थ "झाडपाला खाणे, चरणे, करमणु की करिता वाचणे " असा दिला आहे. खरच किती तथ्य आहे या अर्थात !!) , हल्लीच्या आधुनिक परंतु मनाने आणि बुद्धीने भयंकर मागासलेल्या या जगात "आधुनिक श्यामची आई कशी असावी ?" ह्या माझ्या प्रश्नाला उत्तर मिळाले. नीरा चोप्रा ची अंतःकरणाला भिनवून पोटातल्या कातड्याना पिळवटून टाकणारी गाथा वाचली आणि पुन्हा एकदा मनाने डोळ्यांना कायमचे भिजवून टाकले. काय काय सहन केले असेल ह्या आईने. कुठून आणि कसे एकवटले असेल धैर्य ह्या मातेने, देवावर किती अपरंपार विश्वास आणि भरवसा असेल तिचा, काय काय करू शकते एक जननी आपल्या लेकरांसाठी…. ह्या अशा महान मातेला माझे कोटी कोटी प्रणाम !!!

True Story of Miss India 2009 - an inspiring story for everyone..!! ---(Miss India 2009 - Pooja Chopra) --- --- Neera Chopra is her mother. This is her story.---...Neera Chopra lived through abuse, poverty and some tough choices to make her once-unwanted girl child, Pooja Chopra. --- Neera Chopras story:---

"I don’t know where to begin... they were terrible times. My husband was well-placed, but the marriage had begun to sink almost as soon as it began. Like most women do, I tried to work against all the odds . My in-laws insisted everything would be alright if I had a son. My first child was a daughter, and that didn’t do me any good... but I couldn’t walk out. I had lost my father, my brother was in a not-so-senior position in Bata. I didn’t want to be a burden on my family and continued to live in my marital home in Kolkata.

I looked after my mother-inlaw, who was suffering from cancer, and while bathing her, I would tell myself she would bless me and put things right. I don’t know how I tolerated it all. The least a man can do, if he must philander, is to not flaunt his women in his wife’s face. Then began the manhandling. I still wanted my marriage to survive. I was a pure vegetarian and learnt to cook non-vegetarian delicacies thinking it would please him.

Then, I was pregnant again. When Pooja was eight months in my womb, my husband brought a girl to the house and announced he would marry her. I thought of killing myself. I hung on the slight hope that if the baby was a boy, my marriage could be saved.

When Pooja was born a girl, for three days, nobody came to the hospital. There was a squadron leader’s wife on the opposite bed, who was kind enough to give me baby clothes for Pooja to wear. When she was 20 days old, I had to make a choice. I left the house with my girls ‘ Pooja and Shubra, who was seven then. I haven’t seen my husband since. I promised myself, even if we had just one roti, we would share it, but together.

I began life in Mumbai with the support of my mother, brother, who was by then married. It wasn’t the ideal situation, especially when he had children - space, money, everything was short. I began work at the Taj Colaba and got my own place. How did I manage? Truth be told, I would put a chatai on the floor, leave two glasses of milk and some food, and bolt the door from outside before going to work. I would leave the key with the neighbours and tell the kids to shout out to them when it was time to leave for school.

Their tiny hands would do homework on their own, feed themselves on days that I worked late. My elder daughter Shubhra would make Pooja do her corrections... This is how they grew up. At a birthday party, Pooja would not eat her piece of cake, but pack it and bring it home to share with her sister. When Shubhra started working, she would skip lunch and pack a chicken sandwich that she would slip in her sister’s lunchbox the next day.

I used to pray, ‘God, punish me for my karma, but not my innocent little kids. Please let me provide them the basics.’ I used to struggle for shoes, socks, uniforms. I was living in Bangur Nagar, Goregaon. Pooja would walk four bus stops down to the St Thomas
Academy . Then, too little to cross the road, she would ask a passerby to help her. I had to save the bus money to be able to put some milk in their bodies.

Life began to change when I got a job for Rs 6,000 at the then Goa Penta. Mr Chhabra, the owner, and his wife, were kind enough to provide a loan for me. I sent my daughters to my sister’s house in Pune, with my mother as support. I spent four years working in Goa while I saved to buy a small one-bedroom house in Pune (where the family still lives). I would work 16-18 hours a day, not even taking weekly offs to accumulate leave and visit my daughters three or four times a year.

Once I bought my house and found a job in Pune, life began to settle. I worked in Hotel Blue Diamond for a year and then finally joined Mainland China ‘ which changed my life. The consideration of the team and management brought me the stability to bring them up, despite late hours and the travelling a hotelier must do.

Shubhra got a job in Hotel Blue Diamond, being the youngest employee there while still in college, and managed to finish her Masters in commerce and her BBM. Today, she is married to a sweet Catholic boy who is in the Merchant Navy and has a sweet daughter.

I continue to finish my day job and come home and take tuitions, as I have done for all these years. I also do all my household chores myself.

Through the years, Shubhra has been my anchor and Pooja, the rock. Pooja’s tiny hands have wiped away my tears when I broke down. She has stood up for me, when I couldn’t speak for myself. Academically brilliant, she participated in all extra-curricular activities. When she needed high heels to model in, she did odd shows and bought them for herself.

When I saw Pooja give her speech on TV, I knew it came from her heart. I could see the twinkle in her eye. And I thought to myself as she won ‘My God, this is my little girl.’ God was trying to tell me something.

Today, I’ve no regrets. I believe every cloud has a silver lining. As a mother, I’ve done nothing great."

Pantaloons Femina Miss India Pooja Chopra’s mother promised, ‘One day, this girl will make me proud’.

Pooja speaks on fulfilling that promise... "When I was 20 days old, my mother was asked to make a choice. It was either me, a girl child, or her husband. She chose me. As she walked out she turned around and told her husband, ‘One day, this girl will make me proud’. That day has come. Her husband went on to marry a woman who gave him two sons. Today, as I stand here a Miss India, I don’t even know if my father knows that it is me, his daughter, who has set out to conquer the world, a crown on my head.

"Our lives have not been easy, least so for my mother. Financially, emotionally, she struggled to stay afloat, to keep her job and yet allow us to be the best that we could be. I was given only one condition when I started modelling ‘ my grades wouldn’t drop.

"All the girls in the pageant worked hard, but my edge was my mother’s sacrifice, her karma. Today, when people call to congratulate me, it’s not me they pay tribute to, but to her life and her struggle. She’s the true Woman of Substance. She is my light, my mentor, my driving force." Save The Girl Child.......

देवाच्या कृपेने आपल्या कित्येकांच्या जीवनात कितीतरी प्रकारच्या सुविधा जन्मतःच उपलब्ध असतात. तरी पण आपण कायमचे "तक्रारी " चित्त वृत्तीत असतो. समोर असलेल्या वस्तुत आपले मन कधीच संतोषी नसते आणि नाही त्या वस्तुत कल्पनेने आपले मन गुंतते आणि उगीचच  व्याकूळ होत राहते. खरच कधी सुधारणार ह्या जगाची रीत ? 

Tuesday 16 April 2013


श्यामची आई … 



"आई माझा गुरु, आई कल्पतरू, सुखाचा सागरू, आई माझी प्रीतीचे माहेर, शांतीचे आगर ,मांगल्याचे सार, आई माझी" - साने गुरुजी.

लहानपणी शाळेत असतांना साने गुरुजींचे "श्यामची आई" पुस्तक अगदी मनापासून वाचल्याचे अजूनही लक्षात आहे. कोवळ्या वयात त्या वेळी ह्या पुस्तकातील मातेच्या ममतेच्या महाकाव्याचे मनावर जसे ठसे उठावेत तसे उठले नसावेत ह्याची जाणीव मागच्या महिन्यात स्वतः आईच्या भूमिकेतून हे पुस्तक परत एकदा वाचल्यावर समजले आणि मन खिन्न झाले. यशोदाबाई ने श्यामला दिलेल्या अनमोल संस्कारांचा ठेवा मधून तयार झालेली साने गुरुजींची कोमल वृत्ती, ह्याबद्दल या पवित्र पुस्तकात वाचतांना डोळ्याच्या कडा कितीवेळा पाणावल्या आणि उचंबळून आलेल्या मनातल्या भावनांनी अश्रू मार्फत कधी आणि कसा उच्चार केला हे कळालेच नाही. धन्य ती माता  कि जिने जगाला दाखवून दिले कि  आईचे प्रेम आंधळे नसते. तिचे प्रेम स्वावलंबनाचे धडे देते. अभिमानाने जगायला शिकवते, द्वेष-मत्सरापासून दूर राहायला सांगते. गरिबीत राहून ध्येयवाद दाखवणारी आई, प्रसंगी कठोर होऊन शिक्षाही करते. आणि धन्य ते साने गुरुजी कि ज्यांना अशा मातृ प्रेमाचे अमृत भरभरून पिण्याचे भाग्य मिळाले.  

अंघोळ झाल्यावर श्याम आईला पाय पुसायला सांगतो. त्यावेळी आई म्हणते ''श्याम जसे पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, तसेच मनाला घाण लागू नये म्हणूनही जपत जा. मनाची शुध्दी करण्याकरिता देवाने अश्रूंचे दोन हौद भरून दिले आहे''. भजनाची आवड असलेला श्याम जेव्हा बुवांना चिडविण्यासाठी मोठयाने भजन म्हणतो तेव्हा आई त्याला म्हणते, ''देवाची भक्ती ही मोठयाने नाही तर ह्दयातून केली तर देवा पर्यंत पोहोचते.'' बंधू प्रेमाचे धडे 'चिंधीच्या' गाण्यातून समजावून सांगणारी आई, पोहायला जात नाही म्हणून श्यामच्या पाठीवर चाबकाचे फटके ओढणारी आई, श्यामला कळया न तोडू देणारी आई, महार असलेल्या म्हातारीला मोळी उचलून मानवतेचे धडे देणारी आई, गरीबीतही ताठ मानेने जगणारी आई, आपल्या मुलांनी शिकून मोठे व्हावे म्हणून कष्ट करणारी श्यामची आई.....अशी अनंत रूपे साने गुरूजींनी ४५ भागात लिहून काढली आहेत. 

आतड्यांना पीळ पाडून करुण रसाच्या उदात्त व प्रशांत वातावरणात नेणाऱ्या "श्यामच्या  आई" ने आपल्या समोर एक आदर्श जीवनपद्धती ठेवली त्यात मी स्वताः कुठे कमी पडले हे समजावून घ्यायला फारशी अडचण झाली नाही. विश्वातल्या कोणत्याही संकटाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्याची व या विश्वनिर्मात्यावर दृढ विश्वास ठेवण्याची शिकवण देते, वैचारिक चळवळ घडवणारी, प्रेरणादायी आणि नैतिक मूल्य जपणारी अशी शिकवण देणाऱ्या श्यामच्या आई पुढे आपण किती लहान आहोत याची उशिरा का होईना पण जाणीव झाली. एक क्षणी असे वाटले की , हेच पुस्तक जर मी कित्येक वर्षापूवी जेव्हा माझ्या लेकी लहान होत्या तेव्हाच वाचले असते तर त्यांची मानसिक घडण वेगळी झाली असती काय किंव्हा यशोदाबाई  प्रमाणे मी सुद्धा निस्वार्थ प्रेम करून त्यांच्यावर  संस्कार करू शकले असते काय…? ती वेळ आता माझ्या हातातून निसटून गेली काय? आईसाठी तिची अपत्य कधीच मोठी होत नाहीत, मग मी  कसे मान्य करू की ती वेळ माझ्या हातून निसटून गेली म्हणून? आईच्या प्रेमासाठी आणि संस्कारासाठी मुलांच्या वयाची आडकाठी का बरे यावी? पोटचा गोळा हृदयाला कवटाळण्या करिता मातेला का कुणाची परवानगी घ्यावी लागते? श्यामच्या आईचे अनाकालीन झालेल्या मृत्यूमुळे, माझे असे अनेक प्रश्न अनुत्तरीच राहीले आहेत. प्रत्येक क्षणाला बदलत असलेल्या नीतीमुल्याच्या ह्या आधुनिक जगात, मी आधुनिक श्यामच्या आईची अगदी उत्कंठतेने वाट पाहत आहे. 

Monday 8 April 2013


Keep Smiling...


सिंगापूरहून आम्ही जेंव्हा चेन्नईला आलो तेंव्हा दोन्ही लेकींना चांगल्या शाळेतच प्रवेश घेवून द्यायचा असा आम्ही ठाम निर्णय घेतला. बऱ्याच मित्र मंडळीशी सल्ला मसलत केल्यावर एकमताने आम्ही चिन्मय विद्यालयातच प्रवेशासाठी कसून प्रयन्त करावयाचे ठरविले. देवाच्या कृपेने, लेकींकडे असलेल्या थोड्या बहुत हुशारीने आणि शाळेच्या बिल्डिंग फंड साठी मागितलेल्या पैशाची तरतूद करण्याची आमच्या कडे असलेल्या ऐपतीमुळे, दोन्ही लेकींना सहजासहजी शाळेत प्रवेश मिळाला. त्यानंतर सुमारे नऊ/दहा वर्षे दोघींनी चिन्मय विद्यालयात शिक्षण घेतले. चिन्मय मिशनच्या  "Total Personality Development of the student " ह्या वर सर्व शिक्षकांनी दिलेला भर आणि त्या साठी शाळेच्या अभ्यासक्रमात केलेले सखोल, हेतुपूर्वक केलेले बदल आम्हाला प्रथम पासूनच आवडले होते. त्याचा उपयोग लेकींना त्यांच्या आयुष्यात होईल ह्याची आम्हाला खात्री होती. 

तर अशा ह्या नऊ वर्षाच्या काळात किती वेळा आम्ही नवीन वह्या आणि किती प्रकारची पुस्तके आणली ह्याचा हिशोब ठेवण्याची कधी  गरजच भासली नाही. अर्थात तशी आवश्यकताही नव्हती.  अशा ह्या नवीन वह्यांवर , पुस्तकांवर, शाळेत सर्व ठिकाणी "Keep Smiling " असे छापलेले असायचे. "Keep Smiling " हे चिन्मय विद्यालयाचे ब्रीद वाक्य आहे. आम्ही हे ब्रीद वाक्य अगणित वेळा वाचले असेल. ह्याचा सहज आणि सुलभ अर्थ "हसत राहा " असाच असेल अशा कल्पनेत आम्ही होतो. मुलांची शाळा आणि मुलांनी हसत खेळत अभ्यास करावा असे ह्या  विद्यालयाचे उद्दिष्ट असावे आणि म्हणूनच "हसत राहा " असा संदेश दिला असावा असेच आम्हाला नेहमी वाटत आले. ह्या ब्रीद वाक्यामागील गर्भित संदेश काय आहे हे समजावून घेण्याचा  किती पालकांनी मनापासून प्रयन्त केला असेल कोण जाणे. आमहाला तो  अर्थ कळवून घेण्याची कधी इच्छाच झाली नाही. शाळेत प्रवेश पाहिजे पण शाळेच्या बोधचिन्ह आणि ब्रीद वाक्याबद्दल मात्र काहीच उस्तुकता नाहीं …. हा कसला आपलेपणा !!!

लेकीनी दहावी पर्यंतचे शिक्षण चिन्मय विद्यालयात घेतले. ह्या गोष्टीला आता जवळ जवळ दहा बारा वर्षे होवून गेली. काळाच्या ओघात आणि संसाराच्या भोवऱ्यात सापडलेल्या आमच्यासारख्या पालकांना "Keep Smiling " ह्याचा पूर्णपणे विसर पडला होता. आणि अचानक कुठून तरी वीज चमकली, आमच्या डोक्यात लक्ख प्रकाश पडला आणि आम्हाला ह्या "Keep Smiling" मागचा संदेश कळला. हेच ज्ञान आम्हाला जर १९९४-९५ लेकींच्या प्रवेशाच्या वेळीच जर झाले असते  तर ह्या शाळेकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोणच बदलला असता. शाळेतल्या स्पर्धा, त्यात हमकावून लेकीनी मिळवलेली कित्येक बक्षिसे, कृत्रिमरीत्या हजेरी लावलेली पालक-शिक्षक ह्यांची meetings आणि वार्षिक समारंभ …. ह्या  अशा अनंत रटाळ कार्यक्रमात आम्ही काय कमावले ह्या पेक्षा आम्ही काय गमावले ह्याची जाणीव मला फक्त दोन तीन दिवसापूर्वीच  झाली. ती अशी …

हल्ली आम्ही जोडीने पारमार्थिक वाटेवर वाटचाल करण्याचा प्रयन्त करत आहोत. नियमितपणे दोन-तीन पुस्तकांचे वाचन करतो. अशापैकी एक पुस्तक  स्वामी चिन्मयानंदांचे श्रीमद्भवदगीतेवरील (The  Holy Geeta - Commentary by Swami Chinmayananda) भाष्य आहे. त्यातील अध्याय २ मधील २७ वा श्लोक समजावून घेतांना अचानक आम्हाला "Keep Smiling " ह्यामध्ये असलेला संदेश कळाला. तो असा :

जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च ।  तस्मादपरीहार्येsथ्रे न त्वं शोचितुमर्हसि ।। २ ७ ।। 

jātasya hi dhruvo mṛtyur dhruvaṃ janma mṛtasya ca / tasmād aparihāryerthe na tvaṃ śocitum arhasi 2.27

अर्थ : जो जन्मला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे व जो मृत्यू पावला आहे त्याला जन्म निश्चित आहे.  जन्ममृत्युचे हे चक्र असेच फिरत राहणार आहे. तेंव्हा ज्यावर काही उपाय नाही, जी गोष्ट अटळ आहे त्याचा शोक करणे अयोग्य आहे. 

ह्यावर स्वामीनी जे काही भाष्य केले आहे ते अप्रतिम आहे आणि तेथेच आम्हाला "Keep Smiling " चा अर्थ कळाला. ते सांगतात , "Thus, if life, be, in its very nature, a stream of births and deaths, against this inevitable arrangement, no intelligent man should moan. Standing out in the blazing summer sun, one must, indeed be stupid to complain against its heat and glare. Similarly, having come to life, to complain against the very nature of life is, indeed, an inexcusable stupidity. On this score also, to weep is to admit one's own ignorance. Krishna's life, is, on the whole, a message of cheer and joy. His doctrine of life is an insistence upon, "to weep is folly and to smile is wisdom." So, "Keep Smiling" seems to be Krishna's philosophy put in two words, and that is why , seeing his dear friend weeping in life, the Lord gets whipped up, as it were, to an enthusiasm to save Arjuna from his delusions and bring him back to the true purpose of life."  

म्हणजे Keep Smiling चा अर्थ नुसता हसत रहा एवढाच नसून आपल्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची तक्रार न करता हसत हसत अगदी आनंदाने उल्हसीत होवून जगावे. हाच खरा मानव जन्माला येण्याचा हेतू आहे. अर्थात हे सांगणे जितके सोपे तितकेच अनुकरण करायला कठीण आहे. परंतु प्रयन्त करायला काय हरकत आहे ?     


गुढी पाडवा !



चैत्र शुद्ध प्रतिपदा शके १९३५

महत्वः
वर्षारंभ करण्याच्या अनेक पद्धती आहेत. ख्रिश्चन कॅलेन्डर नुसार १ जानेवारी हा वर्षाचा पहिला दिवस मानला जातो, आर्थिक वर्षारंभ १ एप्रिला होत असतो, हिन्दु वर्षारंभ चैत्र शुद्ध प्रतिपदेला होत असतो, तर व्यावहारिक वर्षाचा आरंभ हिन्दु मान्यतेनुसार कार्तिक महिन्याच्या पहिल्या दिवसापासुन होतो. ह्या सर्व पद्धतींमध्ये वर्षभरात एकूण बारा महिने असतात. पण ह्या सर्वांत प्रश्न असा पडतो की, वर्षात बाराच महिने असतात हा सिद्धांत प्रथम कुणी मांडला? व सर्व जगाने ते मान्य कसे केले? निःसंशय ही संकल्पना सर्वप्रथम आपल्या अतिप्राचिन वेदांतूनच आली आहे. वेदांनुसार वर्षांत बारा महिने असतात हे सर्वांनी मान्य केले. आणि या सर्वांत वर्षारंभासाठी हिंन्दु मान्यतेनुसार सर्वात योग्य दिवस हा चैत्र शुद्ध प्रतिपदा मानला गेला आहे. हिन्दु मान्यतेनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा हाच हिन्दु नववर्षाचा पहिला दिवस का असावा याला अनेक नैसर्गिक, ऐतिहासिक, आणि अध्यात्मिक कारणे आहेत. 

नैसर्गिकः
चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी (पाडवा) सूर्य वसंत ॠतूत प्रवेश करतो (विषुववृत्त व रेखावृत्त यांचा छेदनबिंदू) व वसंत ॠतूला सुरुवात होते. श्रीमद् भगवतगीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात, "सर्व ॠतूत ऊल्हासदायक वसंत ॠतू हे माझे प्रकटीकरण आहे". ह्या ॠतूत सर्व वातावरण ऊल्हासित व आल्हाददायक असते. शिषिर ॠतूत झाडांची पाने गळतात व पाडव्याला, वसंताचे आगमन होउन त्यांना नविन पालवी फुटायला सुरुवात होते. 

ऐतिहासिकः
ह्याच दिवशी रामाने वालीचा वध केला होता. ह्याच दिवशी भगवान श्रीराम सर्व राक्षसांचा व रावणाचा वध करुन अयोध्येला परतले होते. शालिवाहन राजाने त्याच्या शत्रूंना परभूत केल्यानंतर शालिवाहन शकाचा (दिनदर्शिकेचा) आरंभ म्हणूनही हा दिवस साजरा केला जातो. 

अध्यात्मिकः
विश्वाची निर्मीतीः पाडव्याच्या दिवशीच ब्रम्हदेवाने विश्वाची निर्मीती केली असे मानले जाते म्हणूनही हा दिवस नववर्षारंभ म्हणून साजरा केला जातो. 

साडेतीन मुहुर्तापैकी एक मुहुर्तः हिन्दु मान्यतेनुसार गुढिपाडवा, दसरा (विजया दशमी) आणि कार्तिक महिन्याच्या पहिल्या दिवसाचा (बलिप्रतिपदेचा) असे प्रत्येकि एक आणि अक्षय्य तृतिया अर्धा मुहुर्त असा अंतर्भाव करुन "साडेतिन मुहुर्त" योजिले गेले आहेत. या साडेतिन मुहुर्तांचे वैशिष्ट्य असे की या दिवशी कोणत्याही धार्मिक विधी करायला शुभ मुहुर्त काढावा लागत नाही. या साडेतिन दिवसातला प्रत्येक क्षणच शुभ मानला जातो.

गुढीपाडवा साजरा करण्याच्या पद्धतीः 
अभ्यंगस्नानः ह्या दिवशी पहाटे लवकर उठून तेल व उटण्याने अभ्यंगस्नान केले जाते. नित्याच्या स्नानाने रज आणि तम गुण १/१,००,००० % (एक लक्षांश्) ने सौम्य होतात, तर सत्व गुण तितक्याच पटीने वाढतात व त्यांचा प्रभाव फक्त तीन तास टिकतो. हाच प्रभाव तेल व उटण्याने अभ्यंग स्नान केल्यास चार ते पाच तास टिकतो. अभ्यंगस्नानात तेलाने केलेल्या मालिश मुळे त्वचेकडून तेल शोषले जाते व त्यानंतर केलेल्या कोमट पाण्याच्या स्नानाने त्वचा तुकतूकीत व तजेलदार बनते. तेलाच्या मालिश नंतर केलेल्या स्नानाने त्वचा व केसांकडून हवा तेवढाच तेलकटपणा राखला जातो. म्हणुनच अंघोळीपूर्वी तेलाने मालिश करणे कधीही उत्तम. अंघोळीनंतर तेलाने मालिश करणे कधीही अयोग्य. धर्म ग्रंथांनुसार अभ्यंगस्नानसाठी पाच दिवस सांगितले आहेतः १. नववर्षारंभ अर्थात चैत्र शुद्ध प्रतिपदा किंवा गुढीपाडवा (संवत्सर). २. वसंतोत्सवारंभ अर्थात फाल्गुन शुक्ल प्रतिपदा किंवा धुलिवंदन. ३. दिवाळीचे तीन दिवस; अश्विन शुक्ल चतुर्दशी (नरक चतुर्दशी), अश्विन अमावस्या (लक्ष्मी पुजन), व कार्तिक शुद्ध प्रतिपदा (बलिप्रतिपदा).

दारावरील सजावटः अभ्यंगस्नानानंतर दारावर आंब्याच्या डहाळ्या व फुलांचे तोरण बांधले जाते. ह्या दिवशी लाल रंग शुभ असल्याने तोरणात शक्यतो लाल फुलांचा वापर करतात.

धार्मिक पूजाः पाडव्याच्या दिवशी महाशांती पूजा व होम हवन केले जाते. होम हवनात ब्रम्हमंत्र व विष्णू महामंत्राचा जाप केला जातो. त्यानंतर ब्राम्हणांना दक्षिणा अथवा धर्मग्रंथ किंवा पुराणांच्या स्वरुपात दान ऐपतीप्रमाणे दान केले जाते. असे म्हटले जाते की शांती केल्याने सर्व पाप धुतले जातात, पापवृत्ती नाहीशी होते, आरोग्य सुधारते व संपन्नता वाढते. तसेच संवत्सर पूजा केल्याने पाप धुतली जातात, आयुष्यमान वाढते, स्त्रीचे सौभाग्य वाढते व मनःशांति लाभते. 

गुढी उभारणेः प्रत्येक घरावर उभारलेली गुढी (किंवा ब्रम्हध्वज) ही भगवान श्रीरामचंद्रांच्या रावणावरील विजयाचे व त्यांच्या अयोध्यागमनाचे प्रतिक मानले जाते. विजयाचे प्रतिक असल्या करणाने गुढी उंचावर उभारण्याचा प्रघात आहे. गुढी उभारतांना साधारणपणे पिवळ्या किंवा हिरव्या रंगाचे भरजरी वस्त्र एका काठीवर बांधुन कडुनिंबाची पाने, आंब्याच्या डहाळ्या व फुलांच्या हाराने गुढी सुशोभित केली जाते व त्यानंतर चांदीचे अथवा तांब्याचे भांडे त्यावर उपडे ठेवुन गुढी उभारली जाते. त्यानंतर गुढीची मनोभावे पूजा केली जाते. ह्या दिवशी गुढीच्या माध्यमातून प्रजापति लहरी घराच्या वातावरणात प्रवेश करतात व घरात संपन्नता व सुबलता आणतात. पुढे हेच भांडे पिण्याच्या पाण्यासाठी वापरले गेल्यास त्यातल्या पाण्यावरील प्रजापति लहरींचा प्रभाव आपण वर्षभर अनुभवू शकतो.

।। गणपती बाप्पा मोरया , मंगलमूर्ती मोरया ।। 
                                                    (courtesy: Shree Siddhivinayak Ganapati - Mumbai )

Friday 5 April 2013


शेवटचे दोन चमचे …


शुक्रवार …. मिडल इस्ट मधला आठवड्यातील सुट्टीचा पहिला दिवस !! आपल्याकडे weekends  हे नेहमी साफसफाई साठी ठरलेले असतात . लहानपणी रविवारी सकाळी दहा / अकरा वाजेपर्यंत आम्हाला अगदी दिवाळीच्या आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत सुद्धा कधी झोपायला परवानगी मिळत नसे. वडील सकाळी सकाळी आमच्या हातात धूळ पुसायचा कपडा हातात द्यायचे आणि दुपारच्या वेळी आमची आई आमच्या हातात embroidery ची सुई हातात द्यायची !!! अशा दिनचर्येत बाकीच्या दिवसात सकाळी सहा वाजेपर्यंत झोपायला मिळाले तरी आम्ही एकदम खुश !! हल्लीच्या दिवसात हे सर्व बदलले आहे. नोकरी करणारे आई-बाप स्वतःला विश्रांती मिळावी म्हणून मुलांना उशिरापर्यंत झोपायची अगदी बेशक परवानगी देतात. आणि अशाप्रकारे  उशिरा सुरु झालेला दिवस , 'मला आज स्वयंपाक करण्याचा अगदी कंटाळा आला आहे . आपण बाहेर जेवायला जावू या का ?' असे म्हणत म्हणत अगदी पार चित्रपटाच्या रात्री च्या शो पर्यंत येवून ठेपतो . ह्या सर्व मजा मस्ती मध्ये वेळ कसा निघून जातो कळतच नाही आणि घरातल्या बारीक सारीक गोष्टी  कडे नकळत दुर्लक्ष्य होते . मुलांच्या मनावर या अशा दिनक्रमाचा ठसा  कायमचा बसतो आणि मोठेपणी अगदी विनासायास ह्या सर्व कृतींचे अनुकरण होत जाते. आम्ही पण ह्या 'मस्त मजेच्या' जीवनाचा  थोडे दिवस का होईना अनुभव घेतला आणि लवकरच त्यातून बाहेरही पडलो. कारण आमच्या मनावर झालेले संस्कार  वेगळे होते. घरात तेलाची बाटली संपली कि ती उलटी करून त्यातला एक एक थेंब वाटीत गोळा होईपर्यंत बाटली मी अजूनही बाहेर फेकत नाही. गाळणीतल्या  चहा पत्तीचा चमच्याने दाबून दाबून पूर्णपणे अर्क काढून  कोरडी झाल्यावर मगच ती कचऱ्याच्या बकेट मध्ये फेकली जाते. डब्यातले दही संपल्यावर त्यात पाणी घालून पूर्णपणे घुसळून झाल्यावरच तो डब्बा फेकला जातो. बऱ्याचदा  माझ्या अशा ह्या सवयींची लोकांनी चेष्टा  केली आहे. परंतु काय करणार 'सुंभ जळतो पण पीळ जळत नाही अशातली गात झाली आहे. असू देत !!!    

तर अशा एका शुक्रवारी सकाळचा चहा झाल्यावर घरातला शेवटचा दुधाचा डब्बा पूर्णपणे रिकामा करून कट्ट्यावर ठेवला. परंतु नेहमी प्रमाणे उलटा करून त्यातला एक एक थेंब मात्र गोळा केला नव्हता. कसे कुणास ठावूक माझ्या आवडत्या सवयीने मलाच हळुवारपणे हुलकावणी दिली होति. सकाळची गाणी ऐकत , वर्तमान पत्र चाळत आणि पतीदेवाबरोबर गप्पा मारता मारता काही तरी मस्त पैकी चवदार करून खायची इच्छा झाली. Sweet Corn & Green Capsicum Rice ची recipe करून बघायचे ठरवले. लागणारी सर्व सामग्री जुळवून घेतांना अचानक लक्षात आले कि केशर उगाळण्या साठी लागणारे दोन चमचे दुध नाही आहे. गडबडीने माझा हात कट्ट्यावर ठेवलेल्या रिकाम्या दुधाच्या डब्ब्या कडे अगदी अधिरतेने नकळत गेला. देवाचे नाव घेत डब्बा उस्सुकतेने उलटा केला आणि जोराजोराने वरून थोपटला. माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात मी इतकी आशावादी कधीच झाली नव्हते. त्या दोन चमचे दुधाच्या गरजेने माझ्या आशावादी स्वभावाची अगदी जणू काही परीक्षाच घ्यायची ठरवली होती. हुलकावणी दिलेल्या सवयीने मिश्किलपणे हसत हसत माझी मदत केली आणि बरोब्बर दोन चमचे दुध त्या रिकाम्या डब्ब्यातून काढून दिले. ख़ुशी खुशीने तो तीन रंगी भात केला आणि नवरा-बायकोने मिळून मजेत खाल्ला. स्वयंपाक घरात झालेल्या माझ्या ह्या फजितीची पतीदेवाला जरा सुद्धा कल्पना नव्हती. 

तात्पर्य, ह्या घटनेनी मला काय शिकवले ?…. आशावादी असणे चांगले आणि कधी कधी सुंभाबरोबर पीळ जळला तरी आपला फायदा होण्याची शक्यता असते !! आता मला समजले कि, का माझ्या दोन्ही लेकी मला सारखं सांगत असतात कि, "अम्मा, it's perfectly ok to be imperfect ." ह्या पुढे जीवापाड जपलेल्या सवयी मी जरा जपून वापरण्याचा निर्णय केला !!!  पटलं ना तुम्हांला पण ?

Monday 25 March 2013


Pope Francis - एक प्रेमदूत 



१३ मार्चला टी व्ही  संध्याकाळी ७. ३ ० च्या सुमारास सहज म्हणून लावला . बी . बी . सी . वर  Vatican City वरुन चे दुरचित्र वाणीचे सरळ प्रक्षेपण चालू होते. St. Peter's Square मधील  लोक कुठल्यातरी बातमीची आतुरतेने वाट पाहत होते. काय चालले आहे हे समजून घेण्यासाठी आम्हीही T .V . तसाच चालू ठेवला . थोड्याच वेळात लोकांनी टाळ्या वाजवण्यास सुरवात केली. कशासाठी टाळ्या हे समजावून घेण्याचा प्रयत्न चालू असताना लक्षात आले कि त्या लोकांनी एका धुराड्यातून (Chimney ) पांढरा धूर येतांना पाहिला आणि लोक एकदम आनंदाने नाचू लागले. हा सर्व चाललेला प्रकार पाहून मला कुतुहूल वाटले . गुगल वर नेहमी प्रमाणे Vatican City मध्ये काय चालले आहे हे समजावून घेण्याची अगदी तीव्र इच्छा झाली . परंतु T. V. च्या स्क्रीन वर डोळे असे काही खिळले होते कि नजर हलविण्याची तयारी मनाची नव्हती . बऱ्याच वेळाने St. Peter's Basilica च्या सज्जा मधून एक कार्डिनल बाहेर आले आणि त्यांनी एका नावाचे  प्रतिज्ञापन केले. लोक परत जोरात आनंदाच्या जल्लोषात टाळ्या वाजवत नाचू लागले . परंतु ह्या वेळी टाळ्यांचा आवाजात थोडी कमतरता जाणवली . "असे का " ह्याचे उत्तर नंतर कळले . नंतर थोड्या वेळाने St. Peter's Basilica च्या सज्जा मध्ये बरीच हालचाल सुरु झाली आणि थोड्याच वेळेत तेथे एक भारदस्त व्यक्तिमत्व असलेली पांढऱ्या  पोशाखातील एक व्यक्ती बाहेर येवून लोकांकडे पाहत हात हलवत हसत हसत उभी राहिली . ते कोण आहेत ह्याची मला त्या वेळेला थोडी सुद्धा कल्पना नव्हति. परंतु त्यांच्या कडे पाहताच का कुणास ठावूक मला एका प्रेम दुताकडे पाहत असल्याचा भास झाला . त्यांच्या डोळ्यातून प्रेमाचा झरा अगदी अखंड वाहत आहे अशी माझी उगीचच खात्री झाली . ते कोण आहेत, कुठून आले, का त्या सज्जात उभे आहेत, का लोक त्यांना पाहून सुखावले आहेत ह्या सर्व गोष्टींची मला थोडीशीच कल्पना आली होती . असे असतांना सुद्धा , का कुणास ठावूक मला ती व्यक्ती आपल्यातीलच कोणीतरी आहे असे वाटले . जगात त्या क्षणानंतर त्यांना मिळणाऱ्या  मान मतरब , महत्व , प्रत्यक्ष देवाशी केली जाणारी त्यांची तुलना , कित्येक घरात त्यांच्या फोटोला केले जाणारे नमस्कार …. ह्या कुठल्याही गोष्टींची मला त्या क्षणी तरी जाणीव नव्हति. मला जाणवले ते फक्त "प्रेम" कि जे त्यांच्यात अगदी भरभरून वाहत होते. मायेच्या प्रेमात जी ऊब असते ती त्यांच्यात असल्याची जाणीव मला इतक्या दूर असूनही उपजली . एक चित्ताने तो सर्व कार्यक्रम मी डोळे भरून पाहिला आणि दुसऱ्या दिवशी ह्या महान व्यक्तीबद्दल खूप काही समजावून घ्यायचे असे ठरवून शांत मनाने झोपी गेले. 

गूगल वर वाचले असतांना माझ्या सर्व प्रश्नांना उत्तर मिळाले . तसे पाहिले तर ख्रिस्तीधर्म ह्यावर मी कधीच फारसे वाचले नाही आहे. परंतु ह्या प्रसंगा  नंतर का कुणास ठावूक थोडेसे तरी समजावून घेण्याची जिज्ञासा झाली . खरच प्रेमात काय आकर्षण असते ह्याचे मला त्या दिवशी प्रत्यंतर आले. Pope Francis ह्यांच्या प्रेमळ स्वभावाने मला हे जाणवून दिले कि एकमेकांवर प्रेम करण्यासाठी कुठल्याही धर्माचे, लोभाचे , वेळेचे, स्थळाचे, सत्तेचे , जातीचे, रंगाचे…. बंधन नसते. प्रेम हे मुळात रंगहीन आहे. आपण त्यात आपापल्यापरीने रंग भरतो. पोप  हे मुळचे Argentina चे, तेथे त्यांनी गरीब लोकांसाठी खूप काही चांगले केले आहे, त्यांना स्वताला कुठल्याही प्रकारचे अवडंबर केलेले आवडत नाही, त्यांची राहणी एकदम साधी आहे, ते स्वताची कामे स्वतः करतात…अशा अनेक गोष्टींच्या माहितीने मी त्यांची आता खरीच एक चाहती झाली आहे. मायेच्या प्रेमाकरिता आसुसलेल्या माझ्या सारख्या जीवाना Pope Francis सारख्या दूतांची आज अत्यंत आवश्यकता आहे. खरच निर्हेतुक , प्रांजळ , सरळ, सुलभ  प्रेमाची आज ह्या मानसिक विकारात पोळलेल्या जगाला अगदी उत्कंठतेने गरज आहे. अशा स्थितीत का आपण उगीचच हिंदू, मुस्लिम, ख्रिस्त…म्हणून भांडत बसलोय, हे कळतच नाहीं . पोप  हे एक देवाने पाठविलेले प्रेम दूत आहेत ह्याची मला जेंव्हा खात्री झाली तेव्हा ते कॅथोलिक चर्चचे मुख्य अधिकारी होणार आहेत ह्याची मला तिळमात्र जाणीव नव्हती . मग त्यांच्यात प्रकर्षाने वास करीत असलेल्या मायेच्या उबेचा मला कसा सुगावा लागला ? गेले दहा बारा दिवस मी सतत Vatican City , तिथे होण्याऱ्या निवडणुका , तिथला कारभार कसा चालतो …वगैरे गोष्टी बद्दल बरीच माहिती वाचली . त्यातले फारसे काही लक्षात राहिले नाही . लक्षात राहिला आहे तो फक्त Pope Francis ह्यांचा प्रेमपूर्वक हसणारा चेहरा आणि "ह्या पुढे आपण सर्व मिळून एकत्र येवून एकमेकांच्यात फक्त प्रेमाची भाषा बोलूया" ह्या साठी दिलेलं आश्वासन !! 

वर्तमान पत्रात २४ मार्चला त्यांच्या बद्दल लिहिलेले अगदी वाचण्यासारखे आहे. ते असे …. Pope Francis has celebrated his first Palm Sunday mass in St Peter's Square, encouraging people to be humble and young at heart, as tens of thousands joyfully waved olive branches and palm fronds. The square overflowed with 250,000 pilgrims, tourists and Romans eager to join the new pope at the start of solemn Holy Week ceremonies, which lead up to Easter, Christianity's most important day. Keeping with his spontaneous style, the first pope from Latin America broke away several times from the text of his prepared homily to encourage the faithful to lead simple lives. Palm Sunday recalls Jesus's entry into Jerusalem but the Gospel also recounts how he was betrayed by one of his apostles and ultimately sentenced to death on a cross. Recalling the triumphant welcome into Jerusalem, Francis said Jesus "awakened so many hopes in the heart, above all among humble, simple, poor, forgotten people, those who don't matter in the eyes of the world". Francis then told an off-the-cuff story from his childhood in Argentina. "My grandmother used to say, 'children, burial shrouds don't have pockets'" the pope said, in a variation of "you can't take it with you". Since his election on 13 March, Francis has put the downtrodden and poor at the centre of his mission as pope, keeping with the priorities of his Jesuit tradition. His name – the first time a pope has called himself Francis – is inspired by St Francis of Assisi, who renounced a life of high living for austere poverty and simplicity to preach Jesus's message to the poor. Francis wore bright red robes over a white cassock as he presided over the mass at an altar sheltered by a white canopy on the steps of St Peter's Basilica.Cardinals, many of them among the electors who chose him to be pope, sat on chairs during the ceremony held under hazy skies on a breezy day. In his homily, Francis said Christian joy "isn't born from possessing a lot of things but from having met" Jesus. That same joy should keep people young, he said. "From seven to 70, the heart doesn't age" if one is inspired by Christian joy, said the 76-year-old pontiff. Francis said he was looking forward to welcoming young people to Rio de Janeiro in July for the Catholic Church's World Youth Day. So far, that is the first foreign trip on the calendar of Francis's new papacy. The faithful knelt on hard cobblestones paving the square, and Francis knelt on a wooden kneeler at the point in the Gospel that recounts the moment of Jesus's death.

हे सर्व पाहताना , वाचताना, लिहिताना, असे वाटले कि आपण कुठल्याही धर्माचे असलो तरी प्रेमाची, मायेची भाषा सर्वत्र एकच आहे . आपण फक्त तिला आपल्यात एकरूप होवु देत नाही . आपण जास्त महत्व देतो ते विभिन्न प्रकारच्या धर्माच्या पध्दतीना , अंगावरील कातड्यांच्या रंगाना, बोली भाषेला , साठवलेल्या पैश्याला , हाती असलेल्या सत्तेला , समाजात आपल्याला असलेल्या मानाला, अहंकाराला, लालचेला…. आपण आपली आणखी किती दुर्गती करून घेणार आहोत हे फक्त देवच जाणे .  


Wednesday 20 March 2013


घृणास्पद मानवजात 

मागच्या आठवड्यात घरी चालत बोलत नको त्या बातम्या घेवून येणाऱ्या वर्तमानपत्रातील एक लेख वाचून आपण मानवजातीतील एक जण आहोत ह्याबद्दल अभिमान वाटण्या ऐवजी शरम वाटली. त्या लेखातील मजकूर इतका लाजीरवाणा आहे कि एका क्षणी असे वाटले कि देवाला खरोखरच मानव जात उत्पन्न करून किती दुःख आणि पश्चात्ताप झाला असेल ह्याची कल्पना आली .  खरेच आपण असे का करतो ? का आपण एवढे लालची झालो आहोत कि मेलेल्या माणसाला सुद्धा आपण सुखाने झोपू देत नाही . अर्थात हिंदू धर्मात मृतांना अग्नी देतात हे एका दृष्टीने बरेच आहे, असे पण वाटले . ह्या लेखाचे शीर्षक होते , "Rest in pieces". जगातील नावाजलेल्या लोकांची त्यांच्या मृत्युनंतर त्यांच्या मृत देहाची लोकांनी स्वताच्या स्वार्थासाठी  केलेली  हेलना हि अत्यन्त किळसवाणी आहे. उदाहरणार्थ  :- 

१. JOHN MILTON : The English poet best known for Paradise Lost was buried beneath the old London church of St Giles’s, Cripplegate for 16 years before being dug up by parishioners who wanted him to have a proper monument. But before this could be built, a drunk churchwarden and four friends pulled apart Milton’s remains and started selling bits off to morbid souvenir hunters. Thousands of teeth, supposedly all the poet’s, reportedly changed hands over the next few days. There was so little left of Milton that he was reburied at the church in a child’s coffin.

२. EVA PERON : The first lady of Argentina was embalmed on her death at the age of 33 in 1952. The process, ordered by her husband, Juan Peron, involved months of chemical baths and injections, and was performed by a Spanish anatomy professor. By the time he had finished, Evita had shrunk to the size of a 12-year-old girl and, said an observer, rang hollow like a shop dummy if you tapped her. After Peron was deposed in 1955, the new regime — having first cut off one of the fingers of Eva’s corpse to assure themselves it was real— gave the body a secret burial in Italy. But Peronists demanded it back and eventually the exhumed corpse was delivered to the exiled Peron’s villa in Madrid. His new wife restyled Eva’s hair and put her on display in the family dining room. Today Evita rests in a nuclear bomb-proof steel vault in Buenos Aires.

३. JOSEPH HAYDN : The Austrian composer was a victim of phrenology, a 19th-century pseudo-science which claimed that measuring skulls could unlock the rain’s secrets. After Haydn’s death in Vienna in 1809, Carl Rosenbaum, a phrenology-obsessed friend of the deceased, decided that he must have the composer’s skull. He and a fellow phrenologist bribed a gravedigger at Haydn’s modest funeral to give them his severed head. Rosenbaum had the bare skull mounted in a lack case topped with a golden lyre and displayed it in his house. But ten years later Prince Nikolaus Esterhazy, Haydn’s old patron, decided that a grander tomb was needed. When the body was exhumed and the head found to be missing, police raided Rosenbaum’s home but he hid the skull under a mattress, then had his wife lie on top of it. It was a century before the head was reunited with Haydn’s other remains.

४. NAPOLEON : Napoleon Bonaparte wanted to be buried on the banks of the Seine but was instead interred on the island of St Helena, where he had been exiled. But at least one part of his body is said to have made it off the remote mid-Atlantic island — his penis. The emperor’s doctor, Francesco Antommarchi, reportedly took  revenge for abuse he had received from the ailing Napoleon by removing the appendage in his post-mortem examination. Father Vignali, Napoleon’s priest, claimed he took the organ along with some of the dead man’s personal effects, and the collection remained with the Vignali family until it was put up for auction in London in 1916, described as a 'mummified tendon'. It was bought by a London bookseller, then sold to a Philadelphia book collector who in 1927 lent it to a museum in New York.  A reporter for Time magazine said it resembled ‘a maltreated strip of buckskin shoelace or a shrivelled eel’. Eventually it was bought by a top urologist who kept it in a suitcase under his bed until he died in 2007. The French Government has never accepted it as Napoleon’s but, thanks to the urologist’s decision to have it X-rayed, we know for sure what it is, even if not whose it is.

५. ALBERT EINSTEIN : Einstein wanted to be cremated to stop people worshipping his remains. Yet the pathologist who conducted his post-mortem, Dr Thomas Harvey, not only removed his brain but kept it. Harvey chopped the brain into a thousand pieces and divided them between various formaldehyde-filled glass mayonnaise jars. He kept these inside cardboard boxes, beneath beer coolers and under the socks in his wardrobe. Finally, 33 years after he had removed it, in 1988 he surrendered his jars to Princeton Hospital — but their contents were too damaged to be of any scientific use. 

६. OLIVER CROMWELL : The man who had Charles I executed was buried with great pomp, only to be exhumed by a vengeful Charles II and mutilated in 1661. His embalmed head spent more than 20 years on a spike on top of the Houses of Parliament before it reportedly fell off in a storm and landed near a guard. The man took it home and hid it in his chimney, telling his family only on his deathbed. His daughter sold the head, which was eventually exhibited as a curio in London. For years it was widely dismissed as a fake but in 1934, experts compared it to various Cromwell busts and death masks and declared it the genuine article. In 1960 it was buried at a secret location in the grounds of Cromwell’s old Cambridge college, Sidney Sussex.

७. D.H. LAWRENCE : The author of Lady Chatterley’s Lover, who died of tuberculosis in France in 1930, had not specified his final resting place but his widow, Frieda, wanted him brought back to their ranch in Taos, New Mexico. It was five years before Frieda’s lover,  Angelo Ravagli, embarked on the epic trip with an urn containing Lawrence’s ashes — which he accidentally left at the railway station in Taos. A poet friend of Lawrence found the urn and gave it to Frieda — but said he kept some of the ashes, stirring a spoonful into his tea each morning to absorb some of the writer’s genius. 

८. BENITO MUSSOLINI : Il Duce’s brutal end — shot, beaten  to a pulp and hanged upside down outside a petrol station — was followed by burial in an unmarked grave on which his enemies danced. After his body was dug up by loyal Fascists and ferreted away in a wheelbarrow, it was first stored in a garage, then hidden by sympathetic friars in a convent cupboard. It was recovered by the Italian Government and finally, after 11 years,  returned to Mussolini’s home town. The dictator’s mangled remains arrived in a wooden box marked ‘church documents’.

९. GERONIMO : When the great warrior died in 1909 he was buried on an Oklahoma reservation. His body lay undisturbed until the 1980s, when an anonymous source told Apache leaders that Geronimo’s head was now in a glass case in the HQ of America’s most secretive and exclusive student society, Yale’s Skull and Bones. The whistleblower said that the father of President George Bush and grandfather of George W. Bush — both Skull and Bones members — had stolen the skull with other Bonesmen from Geronimo’s grave. It then reportedly sat in the clubhouse and new members had to kiss it at their initiation. Historians suspect that Bush Sr and friends actually stole the wrong skull, breaking into the tomb of another Indian chief by mistake.
                                                                     (………………. Rest in Pieces by Bess Lovejoy, Simon & Schuster)

हा लेख वाचल्यानंतर असे वाटले कि मानव जातीतला चांगुलपणा कुठे तरी हरवून गेला आहे कि काय ? मानवजात ही पशु जाती पेक्षा हि बेशरम आहे कि काय? म्हणून सहज गुगल वर जावून बघितले कि पशु जातीत मांस खावून झाल्यावर ते उरलेल्या हाडांचे काय करतात . बरेच काही वाचल्यावर लक्षात आले कि, पशु जातीत फक्त डुक्कर हा प्राणी असा आहे कि जो काहीही म्हणजे मांस आणि हाडे हे सर्व काही खावू शकतो . परंतु, डुक्कर फक्त लहान आकाराची हाडे खाते आणि मोठ्या म्हणजे स्वताला खाता न येणारे हाड तसेच ठेवून टाकते . मग आहे कि नाही माणसात आणि पशुत फरक ? सहज विचार केला मग आपल्यात वाईट आणि चांगले गुण कोणते ? त्याचा  निष्कर्ष खालील प्रमाणे निघाला .

 What are the worst traits of humanity?

1. The refusal to accept that one is wrong. Can't lose face once invested in something. We call it pride.

2. The fear of what one does not understand. Can't allow the unknown to exist without intrusive and even violent investigation. We call it paranoia (is a thought process believed to be heavily influenced by anxiety or fear, often to the point of irrationality and delusion).

3. The unwillingness to allow others to think and live differently. Can't permit alternative worldviews to thrive. We call it religion.

4. The intense and selfish desire for something esp. wealth & power & in some cases for food. We call it greed. 

What are the best?

1. The willingness to put others before oneself and trust them with our vulnerability. Must ensure the best for another. We call it love.

2. The desire of oneself to understand reality as it actually is. Must discern what is and what is not. We call it truth.

3. The need for wrong to be righted for oneself and others. Must protect innocents from harm. We call it justice.

खोटा गर्व, अज्ञात भीती, धर्माचे केलेले  चुकीचे निर्वचन आणि लोभ ह्या वाईट गुणांनी  प्रेम करण्याची तयारी , सत्य पडताळून पाहण्याची बुद्धी , बरे-वाईट समजून घेण्याची विवेक बुद्धी, न्याय देण्याची कुवत  ह्या चांगल्या गुणांना अगदी नमवून टाकले आहे. हे असेच चालू राहिले तर जगाचा अंत जवळ आला आहे असे समजण्यात काय चुकीचे आहे ? 

Thursday 14 March 2013


♥ सात फेरे ♥

आमच्या लग्नात (माझे वय २४ आणि पतिदेवाचे २९) सर्वांच्या प्रमाणे आम्ही पण सात फेरे घातले होते. हे फेरे का घेतले  जातात ह्याची मला त्या वेळी फारशी कल्पना नव्हति. आजही ह्या क्षणाला मला आठवतो तो फक्त एक मऊ , मुलायम, भोला-भाबडा , स्नेहपूर्वक , आनंदित …असा  स्पर्श !!! एका हाताने दुसऱ्या हाताला दिलेला भरवसा, माझ्या बरोबर अशीच/असाच  कायमची /चा राहा म्हणून नकळत करून घेतलेली खात्री , आदर्शवादी झालो नाही तरी सर्व सामान्य लोकांप्रमाणे आशावादी जीवन आपणपण जगूया ह्याबद्दल एकमेकांना हळूच दिलेला दिलासा …. अशा सर्व भावनांचा त्या वेळी मनात  झालेला कल्लोळ , आज अजूनही ताजातवाना आहे. अजूनसुद्धा आम्ही जेंव्हा हातात हात घेवून फिरावयास जातो तेंव्हा प्रत्येक वेळी ''सात फेरे" घेत आहोत असेच वाटते. तोच स्पर्श, त्याच भावना, तोच भरवसा, तीच खात्री, आणि तोच दिलासा … मला वाटते , हा खरा ''सात फेऱ्यांचा " अर्थ असावा .  


पहिला फेरा :- जोडपं देवाकडे सुखी भावी आयुष्यासाठी प्रार्थना करते. नवरा आयुष्यभर बायको व मुलाला सुखी ठेवण्याचे वचन देतो आणि बायको आयुष्यभर नवऱ्याची व नवऱ्याच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेण्याचे वचन देते. 

दुसरा फेरा :- नवरा आपल्या बायकोला त्याची ताकद बनण्याचे व आयुष्यातील सर्व संकटाना तोंड देण्यासाठी मागे उभे राहण्यासाठी विनंती करतो, हे मान्य करून बायको त्या बदल्यात अशाश्वत प्रेम व प्रामाणीकपणा मागते. 

तिसरा फेरा :- जोडपं, आरोग्य आयुष्यासाठी प्रार्थना करते व धार्मिक राहण्याचे वचन देते तसेच बायको आपल्या नवर्याला त्याच्याशी एकनिष्ठ राहण्याचे आश्वासन देते. 

चौथा फेरा :- आपल्या आयुष्यामध्ये पवित्रता, सुख व मंगलदायकता आणल्या बद्दल नवरा बायकोचे आभार मानतो व बायको नवर्याला कोणत्याही परिस्थितीत आनंदी ठेवण्याचे वचन देते. तसेच दोघे मिळून दोघांच्या कुटुबांची काळजी घेण्याचे, आदर दाखविण्याचे व आनंदी ठेवण्याचे वचन देते. 

पाचवा फेरा :- नैसर्गिक गोष्टींचा आपल्याला लाभ मिळावा व आपल्या पोटी सुदृढ व गुणी बाळ जन्माला यावा ह्यासाठी जोडपं देवाची प्रार्थना करते. 

सहावा फेरा :- नेहमी बरोबर राहण्यासाठी देवाकडे प्रार्थना केली जाते, तसेच नवर्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये व धार्मिक विधींमध्ये त्याची अर्धांगिनी बनण्याचे वचन बायको कडून दिले जाते. 

सातवा फेरा :- सात जन्म हाच नवरा व हीच बायको मिळावी हि प्रार्थना केली जाते तसेच आयुष्यभर दोघे एकमेकांशी प्रामाणिक राहावे व आयुष्यामध्ये भरभराट यावी ह्या साठी सुधा प्रार्थना केली जाते. 


♥ जरी वेगवेगळ्या धर्माची रीत वेगळी असली तरी त्यातील विधींचा अर्थ हा एकाच आहे तो म्हणजे " एकबद्धता " ( Commitment ) , तसेच "तुझ्या प्रेमासाठी व साथीसाठी मी लायक आहे" हे खात्रीने व साक्षीने सांगण्याचा हा एक मार्ग आहे. ♥ ♥ ♥