Wednesday 19 September 2012


मुके प्रेम 

नवीन रिलीज झालेला चांगला  आणि आमच्या वयाला शोभणारा चित्रपट पहिल्या दिवशी नाहीं तर किमान दुसऱ्या दिवशी पाहायचाच, अशा विचित्र हट्टाचा जन्म आमच्या जीवनात अगदी अलीकडेच झाला. मिडल इस्ट देशाने आम्हाला दिलेली ही भेट आम्ही अगदी व्यवस्थितपणे बेमालून वापरतो. मागच्या आठवड्यात "बर्फी" हा चित्रपट सायंकाळी साडेसात चा शो पहाण्यासाठी गेलो. गर्दी खूप असल्यामुळे आम्हाला रात्री दहा च्या शो ची तिकिटे मिळाली. दोन तास काय करायचे म्हणून आम्ही जवळच्याच shopping mall मध्ये चालत चालत उगीचच फिरायला गेलो. परतीच्या सामसूम वाटेवर छान पैकी काळजीपूर्वक वाढवलेली हिरवीगार  झुडुपे नजरेस पडली. आम्ही दोघेही त्याचं कौतुक करत असताना त्या झुडुपातून एक मांजर झटदिशी बाहेर टुपुकन उडी मारून  बाहेर आले. कुणीतरी पाळलेल मांजर असावे ते. काही कृतघ्न लोक मजेसाठी म्हणून जनावर पाळतात आणि कंटाळा आला कि किंव्हा त्यांची काळजी घेणे परवडत नाहीं म्हणून दूर कुठे तरी सोडून त्यांना परक आणि अनाथ करतात. असं अनाथ झालेलं ते मांजर आम्हाला बघितल्यावर एकदम आमच्या मागे मागे यायला लागले. तिला वाटले असेल कि आम्ही तिला आपलंस करून घेवू आणि तिच्यावर प्रेमाची छत्री धरू. खरच, 'आशा' किती फसवी असते !! किती दिवस अशा ह्या फसव्या आशेवर ते मांजर जगत असेल? का कुणी तिला आधी सुखाच्या जीवनाची पहाट दाखवली आणि अचानक एके दिवशी तिला दुखः च्या खाईत लोटले? असा विचार करतकरत तो लांब रस्ता आम्ही पार करत असताना, ते मांजर हळूच एकदा माझ्या बाजूला यायचं आणि हळूच एकदा आनंदच्या बाजूला जायचं. मध्येच जेव्हा तिच्या लक्षात आले कि, आम्हाला तिच्या अस्तित्वाची जाणीव सुद्धा होत नाहीं आहे , तेव्हा ती मागेच थांबली. सहज आम्ही मागे वळून पाहिले, तो काय आश्चर्य, ती पटकन परत उडी मारून पळत पळत आमच्या मागे धावत आली. तिचा तो अधीरपणा पाहून डोळ्यात पाणी आले. आम्ही लक्ष देत नाहीं म्हणून  मध्येच थांबण आणि आम्ही मागे वळून पाहिल्यावर झटदिशी पळत पळत आमच्या मागे येण, तिच्या ह्या कृतीत जिव्हाळ्याचा, प्रेमाचा, लाघाविपणाचा , ममतेसाठी आसुसलेल्या त्या अबोल जीवाच्या धडपडीची आम्हाला जाणवली आणि आपण ह्या साठी फारसे काही करू शकत नाहीं ह्याची खंत वाटली. फक्त दहाच मिनिटात एकमेकांशी काहीही न बोलता , काहीही व्यक्त न करता त्या मांजरीने आमच्याकडून बिनशार्तीने दिलेले आणि मागितलेले प्रेम आमच्या हृदयावर कायमचा ठसा मांडून  गेले. रस्ता ओलांडताना रस्त्यावरची वेगाने धावणारी वाहन पाहून मन कचरलं. सहज मागे वळून पाहिलं आणि ते गोंडस मांजर झुडुपात गपचूप बसलेलं नजरेला पडलं. पलीकडच्या रस्त्यावर जायच्या  आमच्या मार्गक्रमणाचा किती बरोब्बर  अर्थ तिला कळला होता. अशी निराशा किती वेळा तिच्या पदरी पडली असेल, काय वाटत असेल तिला, कसे झेपत असेल ती हे सर्व.....त्या मुक्या प्राणीला जोराने ओरडून काही सांगावंसे वाटत नसेल का? का कळत नाहीं अशा मुक्या जनावरांच्या भावना माणसाला? का मग त्यांना स्वछंदपणे  राहू देत नाहीं? मनातल्या ह्या अशा अनेक प्रश्नांना  कधी उत्तर मिळेल कि नाहीं , फक्त देवास ठाऊक.  .........

दूर्वा - शमी - मंदार - या तीन वनस्पती गणपतीला प्रिय आहेत. यांतील दूर्वा ही साक्षात ब्रह्मदेवाच्या शरीरातून निर्माण झालेली एक सुंदर देवता होय. ब्रह्मदेवाने तिचे दूर्वा हे नाव ठेवले. तिने पुढे तप केले व ती गणेशाला प्रिय ठरली.

कालांतराने तिला आपल्या ऐश्वर्याचा गर्व झाला. ती जगदंबेहूनही स्वतःला श्रेष्ठ समजू लागली. तेव्हा पार्वतीने तिला तृणरूपाने पृथ्वीवर जन्म घेण्याचा शाप दिला. पुढे तप करून तिने या शापातून मुक्ती मिळवली. ती अंशरूपाने पृथ्वीवर राहून गणेशाच्या पूजेत आवश्यक बनली व उर्वरित अंशांनी स्वर्गात देवीरूपाने राहिली.

और्वऋषीला शमिका नावाची मुलगी होती. धौम्य ऋषीचा मुलगा मंदार याच्याशी तिचा विवाह झाला. त्यांच्या आश्रमात एकदा भृशुंडी ऋषी आले असता त्यांचे मोठे पोट व स्थूल शरीर पाहून ती दोघे त्यांना हसली. तेव्हा भृशुंडी ऋषींनी त्यांना शाप दिला, की 'तुम्ही दोघे वृक्षयोनीत जन्म घ्याल.' त्याप्रमाणे ती दोघे शमी व मंदार बनली. पुढे मंदाराचा गुरू शौनक व सासरा और्व यांनी गणेशाला प्रसन्न करून घेण्यासाठी तप सुरू केले. गणेश प्रसन्न झाला. तेव्हा त्यांनी शमी-मंदाराला पूर्व देह प्राप्त व्हावा, असा वर मागितला. त्यावर गणपतीने म्हटले की, 'भृशुंडीचा शाप खोटा ठरणार नाही. पण आजपासून मी मंदारवृक्षाच्या मुळाशी वास करीन व शमीपत्रे मला प्रिय होतील.' मंदार वृक्षाच्या मुळाची गणेशमूर्ती करतात व हा मंदारगणेश भक्तांना लवकर प्रसन्न होतो, असा समज आहे.

No comments:

Post a Comment