Monday 8 April 2013


Keep Smiling...


सिंगापूरहून आम्ही जेंव्हा चेन्नईला आलो तेंव्हा दोन्ही लेकींना चांगल्या शाळेतच प्रवेश घेवून द्यायचा असा आम्ही ठाम निर्णय घेतला. बऱ्याच मित्र मंडळीशी सल्ला मसलत केल्यावर एकमताने आम्ही चिन्मय विद्यालयातच प्रवेशासाठी कसून प्रयन्त करावयाचे ठरविले. देवाच्या कृपेने, लेकींकडे असलेल्या थोड्या बहुत हुशारीने आणि शाळेच्या बिल्डिंग फंड साठी मागितलेल्या पैशाची तरतूद करण्याची आमच्या कडे असलेल्या ऐपतीमुळे, दोन्ही लेकींना सहजासहजी शाळेत प्रवेश मिळाला. त्यानंतर सुमारे नऊ/दहा वर्षे दोघींनी चिन्मय विद्यालयात शिक्षण घेतले. चिन्मय मिशनच्या  "Total Personality Development of the student " ह्या वर सर्व शिक्षकांनी दिलेला भर आणि त्या साठी शाळेच्या अभ्यासक्रमात केलेले सखोल, हेतुपूर्वक केलेले बदल आम्हाला प्रथम पासूनच आवडले होते. त्याचा उपयोग लेकींना त्यांच्या आयुष्यात होईल ह्याची आम्हाला खात्री होती. 

तर अशा ह्या नऊ वर्षाच्या काळात किती वेळा आम्ही नवीन वह्या आणि किती प्रकारची पुस्तके आणली ह्याचा हिशोब ठेवण्याची कधी  गरजच भासली नाही. अर्थात तशी आवश्यकताही नव्हती.  अशा ह्या नवीन वह्यांवर , पुस्तकांवर, शाळेत सर्व ठिकाणी "Keep Smiling " असे छापलेले असायचे. "Keep Smiling " हे चिन्मय विद्यालयाचे ब्रीद वाक्य आहे. आम्ही हे ब्रीद वाक्य अगणित वेळा वाचले असेल. ह्याचा सहज आणि सुलभ अर्थ "हसत राहा " असाच असेल अशा कल्पनेत आम्ही होतो. मुलांची शाळा आणि मुलांनी हसत खेळत अभ्यास करावा असे ह्या  विद्यालयाचे उद्दिष्ट असावे आणि म्हणूनच "हसत राहा " असा संदेश दिला असावा असेच आम्हाला नेहमी वाटत आले. ह्या ब्रीद वाक्यामागील गर्भित संदेश काय आहे हे समजावून घेण्याचा  किती पालकांनी मनापासून प्रयन्त केला असेल कोण जाणे. आमहाला तो  अर्थ कळवून घेण्याची कधी इच्छाच झाली नाही. शाळेत प्रवेश पाहिजे पण शाळेच्या बोधचिन्ह आणि ब्रीद वाक्याबद्दल मात्र काहीच उस्तुकता नाहीं …. हा कसला आपलेपणा !!!

लेकीनी दहावी पर्यंतचे शिक्षण चिन्मय विद्यालयात घेतले. ह्या गोष्टीला आता जवळ जवळ दहा बारा वर्षे होवून गेली. काळाच्या ओघात आणि संसाराच्या भोवऱ्यात सापडलेल्या आमच्यासारख्या पालकांना "Keep Smiling " ह्याचा पूर्णपणे विसर पडला होता. आणि अचानक कुठून तरी वीज चमकली, आमच्या डोक्यात लक्ख प्रकाश पडला आणि आम्हाला ह्या "Keep Smiling" मागचा संदेश कळला. हेच ज्ञान आम्हाला जर १९९४-९५ लेकींच्या प्रवेशाच्या वेळीच जर झाले असते  तर ह्या शाळेकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोणच बदलला असता. शाळेतल्या स्पर्धा, त्यात हमकावून लेकीनी मिळवलेली कित्येक बक्षिसे, कृत्रिमरीत्या हजेरी लावलेली पालक-शिक्षक ह्यांची meetings आणि वार्षिक समारंभ …. ह्या  अशा अनंत रटाळ कार्यक्रमात आम्ही काय कमावले ह्या पेक्षा आम्ही काय गमावले ह्याची जाणीव मला फक्त दोन तीन दिवसापूर्वीच  झाली. ती अशी …

हल्ली आम्ही जोडीने पारमार्थिक वाटेवर वाटचाल करण्याचा प्रयन्त करत आहोत. नियमितपणे दोन-तीन पुस्तकांचे वाचन करतो. अशापैकी एक पुस्तक  स्वामी चिन्मयानंदांचे श्रीमद्भवदगीतेवरील (The  Holy Geeta - Commentary by Swami Chinmayananda) भाष्य आहे. त्यातील अध्याय २ मधील २७ वा श्लोक समजावून घेतांना अचानक आम्हाला "Keep Smiling " ह्यामध्ये असलेला संदेश कळाला. तो असा :

जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च ।  तस्मादपरीहार्येsथ्रे न त्वं शोचितुमर्हसि ।। २ ७ ।। 

jātasya hi dhruvo mṛtyur dhruvaṃ janma mṛtasya ca / tasmād aparihāryerthe na tvaṃ śocitum arhasi 2.27

अर्थ : जो जन्मला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे व जो मृत्यू पावला आहे त्याला जन्म निश्चित आहे.  जन्ममृत्युचे हे चक्र असेच फिरत राहणार आहे. तेंव्हा ज्यावर काही उपाय नाही, जी गोष्ट अटळ आहे त्याचा शोक करणे अयोग्य आहे. 

ह्यावर स्वामीनी जे काही भाष्य केले आहे ते अप्रतिम आहे आणि तेथेच आम्हाला "Keep Smiling " चा अर्थ कळाला. ते सांगतात , "Thus, if life, be, in its very nature, a stream of births and deaths, against this inevitable arrangement, no intelligent man should moan. Standing out in the blazing summer sun, one must, indeed be stupid to complain against its heat and glare. Similarly, having come to life, to complain against the very nature of life is, indeed, an inexcusable stupidity. On this score also, to weep is to admit one's own ignorance. Krishna's life, is, on the whole, a message of cheer and joy. His doctrine of life is an insistence upon, "to weep is folly and to smile is wisdom." So, "Keep Smiling" seems to be Krishna's philosophy put in two words, and that is why , seeing his dear friend weeping in life, the Lord gets whipped up, as it were, to an enthusiasm to save Arjuna from his delusions and bring him back to the true purpose of life."  

म्हणजे Keep Smiling चा अर्थ नुसता हसत रहा एवढाच नसून आपल्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची तक्रार न करता हसत हसत अगदी आनंदाने उल्हसीत होवून जगावे. हाच खरा मानव जन्माला येण्याचा हेतू आहे. अर्थात हे सांगणे जितके सोपे तितकेच अनुकरण करायला कठीण आहे. परंतु प्रयन्त करायला काय हरकत आहे ?     

No comments:

Post a Comment