Thursday 5 July 2012



हे अस काय?....कळते पण वळत नाही !!



अनुत्तरीत राहिलेली अशी अनेक प्रश्नांची मालिका....त्यातील काही थोडेसे प्रश्न...

१. आपण कुणाच्या घरात जन्म घ्यायचा हे आपल्याला का ठरविता येत नाहीं ?
२. बालपणी शाळेतल्या मास्तरांशी आणि आई-वडिलांशी आपले पटत नाही, त्यांनी आपल्याला काहीही समजून सांगितलेले आपल्याला कळवून घ्यायची इच्छा नसते, तरुणपणी नवऱ्याचे ऐकावेसे वाटत नाही, ऑफिस मध्ये बॉसशी आपले नेहमीच भांडण,  म्हातारपणी आपल्या मुलांच्या आणि आपल्या विचारात ताळमेळ नसतो, नातवंडांशी आपले बरेच वेळा मस्त जमते परंतु त्यांना आपले विचार आणि कृती गंजलेल्या सारखे उगीचच वाटते. हे असे का?
३. जेवायला ताट तयार केल्या वर आपल्या  नवऱ्याला टी. वी. च्या रिमोट कंट्रोल ची आठवण बरोब्बर कशी होते?
४. आपल्या मुलांपेक्षा आणि नवऱ्या पेक्षा    दुसऱ्यांची मुले आणि नवरे  नेहमीच का  स्मार्ट वाटतात?
५. आपलीच मुले आपला, दुसऱ्यांच्या समोरच का नेहमी अपमान करतात? आपण त्यांचे काय वाईट केलेले असते  म्हणून ते आपल्याला असे उघडे पाडतात?
६. घरात एखादा पदार्थ अगदी रुचिरा पुस्तकात बघून जसाचा तसा बनवण्याचा पर्यंत अगदी मनापासून केलातरी चांगला कधीच होत नाहीं, ह्याच्या उलट कधीतरी अगदी बेफिकीर होवून केलेला पदार्थ मात्र बेमालून रुचकर होतो कि त्याची रेसिपी आपल्या लक्षातसुद्धा राहत नाही. हे असे का?
७. तरुणपणी डोक्यावर भरपूर केस असतात तेंव्हा त्याची काळजी घेण्यासाठी आपल्या जवळ वेळ नसतो आणि म्हातारपणी जेंव्हा भरपूर वेळ असतो तेंव्हा डोक्यावर केस नसतात. हे असे का?
८. माणसाजवळ जेंव्हा पैसा नसतो तेंव्हा पैसा मिळाल्यावर काय काय मज्जा करायची ह्याची तो भरपूर गणिते मांडतो परंतु पैसा मिळाल्यावर हि सर्व गणिते उलटी पुल्टी होवून जातात. हे असे का?
९. गर्दीच्या वेळी पार्किंग लोट मध्ये आपल्यालाच का पार्किंगसाठी जागा मिळत नाही?
१०. दुकानात आपल्या आवडीची साडी/ड्रेस मटेरीअल नेमकी दुसरीच बाई कशी काय विकत घेते?
११. दुसऱ्यांच्या घरात लग्न भरभर उरकल्यासारखी का वाटतात?
१२. आपल्या मुलांना पगार दुसऱ्यांच्या पेक्षा का कमी मिळाल्या सारखा वाटतो?
१३. जगात सुबत्ता नको त्या ठिकाणी का आहे?
१४. तरुणपणीच देवावरच्या श्रद्धेचे महत्व का कळत नाही?
१५. हल्लीच्या काळात ओल्ड ऐज होम्सना एवढे का महत्व प्राप्त झाले आहे? हल्लीची तरून मंडळी स्वत: कधीही म्हातारे होणारच नाहीत असे का समजतात?
१६. देव सर्व चराचर मद्धे भरून आहे तर ह्या सृष्टीला त्याच्या मायेचे रूप कसे देवू?
१७. आपल्या नात्यागोत्यातली माणसे कधी दूरची तर कधी जवळची का वाटतात? ह्यात संपूर्ण दोष आपलाच असतो काय?
१८. आजूबाजूच्या परिस्थितीत काहीही बदल झालेला नसतांना सुद्धा मन कधी आनंदी तर कधी उधास असते. हे असे का?
२०. एखादे न आवडणारे काम उरकण्यासाठी फक्त पाच मिनिटेच लागतात, मग ते काम करावेसेच का वाटत नाही?
२१. एखाद्या देशात राजा प्रजेला रोटी, कपडा, मकान आणि शिक्षण ह्या गोष्टी मोफत देत असताना सुद्धा प्रजा का कुरबुर करते?
२२. जेंव्हा कोणाला तरी आपल्या घरी येवून राहावयाचे असते तेंव्हा आपण सर्व प्रकारची सुविधा त्या माणसाला करून देतो आणि त्याचे आपल्या घरात मस्त पैकी पाहुणचार करतो. परंतु आपल्याला जेंव्हा आपल्याला त्याच्या घरी जायचे असते तेंव्हा तो नेमका कसा गावाला जातो?
२३. तोकडे कपडे दुसऱ्यांच्या अंगावर चांगले दिसतात पण आपल्या मुलींनी तसले कपडे घातलेले आवडत नाहीत. असे का?
२४. जगात कब्बडी, खो-खो, लंगडी सारखे सुरेख मस्त खेळ असतांना लोक क्रिकेट लाच का इतके महत्व देतात?
२५. देवाच्या अस्तित्वाची एकदा मनात पक्की खात्री झाल्यावर आपण परत परत त्या बद्दलचे लिखाण का वाचतो? मनात झालेल्या त्या पक्क्या विश्वासाच्या हिंदोळ्यात मनाला आनंदाने का राहू देवू शकत नाही?
२६. चाळीशी नंतर विशीचे चाळ बायकांच्या पेक्षा पुरुषांना का जास्त लागतात?
............................................................................................................बाकी प्रश्न पुढल्या पोस्त मध्ये ..

No comments:

Post a Comment