Friday 27 July 2012

संस्कार 


खरच आपले भारतीय संस्कार किती प्रगल्भ मानसिक बळ वाढविणारे आहेत. प्रत्येक पावली आपल्याला हेच सांगते कि, एकमेकात प्रेम वाढविणे आणि नंतर ते जोपासणे ही काही एका रात्रीत घडणारी गोष्ट नव्हे.  देवावरची भक्ती, कशी थोडी थोडी वाढवीत जावून शेवटी आत्मसाक्षात्कार घडवून घेण्याचा प्रयन्त करणे हे जसे, "it is a process and not an event", तसेच आपापसात प्रेम, जिव्हाळा वाढवण्याचा प्रयत्न हा सर्वांनी मिळून कसोशीने करायला आपली भारतीय संस्कृती सांगते. "Compatibility", हा शब्द अगदी अलीकडला आहे. अहो, आमच्या लग्नाला २८ वर्षे झाली , परंतु आजही , आम्ही एकमेकाला पूर्णपणे ओळखू शकलो नाहीत आणि आमचा तसा आता हट्टही नाहीं. जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती  आणि आपल्या हाताचीच बोटे तरी कुठे सारखी आहेत ? पण हृदयातल्या मुळाशी कुठेतरी घट्ट रोवलेल्या त्या संस्कारांनी आम्हाला कसे एकमेकात मस्तपैकी गुंतवून ठेवले आहे.  
.
लग्नात , हे कशासाठी ??

1)लग्नात मांडव कशासाठी???
= मातेनं, माझ्या मुलीचं मनही मांडवा सारखा मोठं आहे,हे सांगण्यासाठी !!!

2)विहिनबाईला आणि नवरदेवाला स्वागतास पायघड्या कशासाठी???
= माझ्या मुलीला तुम्ही असचं अलगद सांभाळा,हे सांगण्यासाठी !!!

3)नवरदेवाची कानपिळी वधुच्या भावानेचं पिळायची,हे कशासाठी???
=माझ्या बहिणीला तुमच्या जीवनात नीट आणि चांगलं वागवा,हे सांगण्यासाठी !!!

4)मुलीच्या मागं मामाचं उभा राहतो,हे कशासाठी???
= मुलीच्या आईला,मी तुझ्या पाठिशी भक्कम उभा आहे,हे सांगण्यासाठी !!!

5)लग्नात वधु-वरांनी एकमेकास घास द्यायचा,हे कशासाठी???
= प्रेमाचं हे प्रतिक आहे। तुझ्या- माझ्यात काही अंतर राहिलेलं नाही,हे सांगण्यासाठी !!!

6)लग्नात सप्तपदी घालावी,हे कशासाठी???
= तुमच्या सुख-दु:खात मी आता सोबत आहे. सात पावलं हि मर्यादा आहे,हे सांगण्यासाठी !!!

7)लग्नात तांदळाची अक्षता उधळण कशासाठी???
= तुमच्या घरात धान्य भरपुर असु दे.त्यात सारं मांगल्य आहे,हे सांगण्यासाठी !!!

चला तर, ह्या एकुलत्या एक आयुष्यात, प्रेमाने एकमेकांना घट्ट उराशी धरून डोळ्यावर चढणाऱ्या त्या धुंद नशेत, देवाला पदोपदी आठवत, मस्त मजा करूया !! 

No comments:

Post a Comment