Thursday 12 July 2012

अचानक......


अचानक...., काल मॉलमध्ये असताना, एक २/३ वर्षाची मुलगी धापदिशी जमिनीवर आपटते, तिला जोरात पडताना पाहून माझ्या तोंडातून नकळत किंकाळी बाहेर पडते. ती छोटीसी मुलगी माझाकडे पाहून हसते आणि पळत-पळत जावून तिच्या आईच्या पायाला घट्ट मिठी मारते. मागे वळून आईला सांगते, "mummy, let us scold that floor. It badly hurt me. But it's ok, not now. Let us go." आणि हसत-हसत ती निघून जाते. क्षणार्धात घडलेली ही घटना, मनाला खूप काही सांगून जाते. बालपण किती सुंदर निष्पाप, निर्भेळ, निरागस  आणि गोन्जळ असते. पडलेल्याच दुखः नाहीं आणि पाहणारे काय म्हणतील याची खंत नाहीं. ह्याच्या उलट, आईच्या पायाला घट्ट मिठी मारून तिच्या आसऱ्यात जगातली कुठलीही  गोष्ट आपले काहीही वाईट करू शकणार नाहीं यावराचा तिचा विश्वास किती अनमोल आहे, असे वाटले. मोठे झाल्यावर, आपल्याला सुद्धा असेच का राहता येत नाहीं ? देवाला आपली आई मानून का आपण तिच्या कुशीमध्ये निवांत तिचे नामस्मरण करीत  आपले कर्तव्य करीत राहू शकत नाहीं? किती साधी कृती, पण का ती आपण नजरे आड करतो? आपल्या आईवर आपले जेवढे प्रेम आणि भक्ती आहे, तेवढे देवावर नाहीं म्हणून का असे होते? 

असा विचार करत असतांना, Baskin Robbin मध्ये icecream खायची इच्छा झाली. counter वरचा saleman इतका खुशालचेंडू होता कि सर्वांशी तो एकदम मजेत हसत विनोद करत बोलत होता. वाटले कि त्याला कशाची परवाच नाहीं आहे. न राहवून  त्याला शेवटी आम्ही विचारले कि ," तू इतका आनंदी नेहमीच असतोस का ?"  त्यावर तो म्हणाला, "का असू नये, माझा स्वभावाच असा आहे. तुम्ही कुठले ?" आम्ही बेंगलोरचे, तुम्ही कुठले? त्यावर तो , "मी पण तिथलाच. अरेच्या, आधीच सांगितले असते तर तुम्हाला icecream जास्त दिले असते. काही हरकत नाहीं, next time याल तेव्हा नक्की जास्त देईन. अम्मा, तुम्हाला पाहून मला बरे वाटले. माझ्या अम्मीची आठवण झाली आणि डोळ्यात पाणी आले. " एक अनोळखी माणूस, परक्या देशात भेटला परंतु, मनाशी नातेमात्र अचानक आणि त्वरित जुळले. परत एका निरागस माणसाशी भेट झाली. कालचा दिवसच छान होता. का आपल्याला पण त्याच्या सारखे निरागस होवून प्रत्येक क्षणाचा आनंद  घेता येत नाहीं म्हणून मन हुरहुरले. जीवनातल्या कमतरतेची जाणीव न ठेवता चेहऱ्यावर सतत हसू सांभाळून ठेवणे हे काही सर्वाना साधत नाहीं. आपण तसा प्रयत्नही करत नाहीं. का? 

किती काही करायचे उरून गेले आहे, किती अजून शिकायचे आहे, हे आयुष्य असेच संपून जाणार काय ? वाया घालवलेला वेळ परत येणार नाहीं याची तीव्रतेने जाणीव झाली ......  

No comments:

Post a Comment