Saturday 25 August 2012


अवसरवादी दुनिया 

दोन दिवसापूर्वी, आमच्या घरी कामाला येणारा मुलगा ठरल्या वेळेपेक्षा उशिरा आला. जेव्हा आला , माझ्या लक्षात आले कि त्याचा चेहरा एकदम कोमेजून गेला आहे. चिंतीत चेहऱ्याने मी त्याला ह्याचे कारण विचारले. त्याने सांगितले कि, एका साहेबाने त्याला त्याच दिवशी सकाळी २५० Dhs  दिले होते आणि ते तो कुठेतरी हरवून आला होता. सगळीकडे शोधल्यावर सुद्धा त्याला ते मिळाले नाहीत. नेहमी, कचऱ्याची पिशवी अगदी दोनच बोटात पकडून नेण्याऱ्या त्या मुलाने त्या दिवशी संपूर्ण कचऱ्याचा डब्बा पूर्णपणे पालथा पडून हाथ घालून २-३ वेळेला उचकून बघितला होता. हताश झालेला माणूस काहीही करण्यास करायला तयार होतो, ह्याचे हे ज्वलंत उदाहरण. देव करो आणि अशी परिस्थिती आपल्या शत्रूवर सुद्धा येवू नये. त्यात त्याला ते पैसे त्याच्या आईला पाठवून द्यायचे होते. ऐकून वाईट वाटले. हल्ली हल्लीच आध्यत्मिक वाचन सुरु केल्यामुळे, त्या त्रोटक्या अभ्यासाच्या आधारावर त्याला एक छानसा उपदेश केला. खर म्हणजे त्याला त्या उपदेशाची जरा सुद्धा आवश्यकता नव्हती. त्याला म्हटलं, "अरे, ते पैसे तुझे नव्हते म्हणून समज. आणि, असं समज कि, देवाच्या कृपेने पुढे होणारी मोठी बला छोट्यावर वर निभावून गेली." किती सहजपणे सगळ सांगितलं मी त्याला. हे ऐकल्यावर त्याच्या चेहऱ्यावर एक गुढतेच हास्य होतं. खरच ते पैसे हरवल्यानंतर झालेल्या दुख्खाची मला कशी कल्पना असणार. त्याच्या दुख्खाची आपण चेष्टा तर केली नाहीं ना? असे वाटून मन हुरहुरले. 

दुसऱ्या क्षणी असे वाटले कि, त्याला आपण २५० Dhs देवून टाकावेत. पण दुसऱ्या क्षणी वाटले, तो खर तेच सांगत असेल ह्याची काय खात्री? मी जेव्हा business करत होते, तेव्हा एक-दोघांनी मला असेच काही तरी सांगून फसवले होते. त्या चांगल्या कर्माच्या मोबदल्यात मिळालेल्या वेदनेची आठवण अजूनही ताजी आहे. काय मज्जा आहे बघा, जुन्या आठवणींची आपल्या मनावर किती  जबरदस्त पक्कड असते !! पण मग, ह्या वेळेस जर माझ्या मनाने चांगले काम करण्यापासून माझे जर हाथ आखडले, तर ह्यात चूक कोणाची...माझी का मल्या आलेल्या वाईट अनुभवांची का बदलत चाललेल्या अवसरवादी दुनियेची ? 

५) ढुंढिराज गणेश - उत्तरप्रदेश, भारत : - (DHUNDHIRAJ GANESH – Uttar Pradesh, India)
भस्मासुर नावाच्या राक्षसाला भगवान शंकरांनी वर स्वरुपात एक अशी शक्ति प्रदान केली कि, त्याने कोणाच्याहि डोक्यावर स्पर्श केला तर ती व्यक्ती भस्मसात होईल. अशी शक्ति प्रदान झाल्यानंतर भस्मासुर स्वतःला खुप शक्तिशाली आणि अजिंक्य समजु लागला होता. मिळालेल्या शक्तिचा तो दुरुपयोग करु लागला. येणार्या जाणार्या सर्व निरपराध आणि साध्या माणसांच्या विनाकारण डोक्यावर हात ठेवुन त्यांना भस्मसात करु लागला. शेवटि भगवान विष्णुंनी त्याचा वध केला.

परंतु नंतर भस्मासुराचा मुलगा दुरासद, ह्यने सुद्धा आपल्या पित्याप्रमाणे खुप मोठि अखंड तपश्चर्या करुन भगवान शंकरांना प्रसन्न करुन घेतले. आणि त्याच्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्याला दर्शन दिले. दुरासदाने मग भगवान शंकारांकडे वरदान स्वरुपात त्रिलोकात अधिकार प्राप्त होण्याचा वर मागुन घेतला. सोबतच त्याने अमरत्व देखिल मागुन घेतले.

ऋषिवर्य नारदमुनींनी त्याला संपवण्यासाठि म्हणुन त्याला खोडसाळ पणे असं सांगितलं कि, दुरासदा तु जरी स्वतःला त्रिलोकाचा राजा समजत असलास तरीहि तुला काशी वर अधिकार कधिहि गाजवता येणार नाहि. कारण काशी मध्ये साक्षात भगवान शंकरांचा वास आहे. तिथे तुला अधिकार गाजवता येणार नाहि. याचाच अर्थ कि तु त्रिलोकाचा राजा कधिहि होऊच शकत नाहिस. बघ आता तुच काय ते ỊỊỊỊ असं सांगुन नारदमुनी अदृश्य झाले. नारदमुनींनी सांगितलेले ऐकुन दुरासदाला रहावलं नाहि आणि सरळ त्याने काशीकडे प्रस्थान करुन काशी वर अधिकार मिळवण्यासाठि चढाई केली. हे पाहुन भयभीत नारदमुनी लगेचच देवी पार्वतीकडे जाउन सर्व घटना कथन केली. आणि असाहि सल्ला दिला कि देवी पार्वतीने लगेचच एका अश्या शक्तिशाली बालकाला निर्माण करावे कि जो दुरासदाचा वध करेल. आणि त्यासाठि देवी पार्वतीने लगेचच ।। ॐ ।। मंत्राचा जप करुन एका बालकाला निर्माण केले. ह्या बालकाला चार हात आणि सोंड होती. तोच श्री गणेश. देवी पार्वतीने मग श्री गणेशाला लगेच आज्ञा केली कि त्याने त्वरीत काशीला जाऊन दुरासद राक्षसाचा वध करावा.

श्री गणेश मग ताबडतोब आपल्या आईने दिलेल्या आज्ञेचे पालन करण्यासाठि सिंहावर बसुन काशीस रवाना झाले. भगवान श्री गणेशाने दुरासद राक्षसाला शोधुन काढले आणि त्यावर चढाई केली. दुरासदाला अमरत्वाचे वरदान होतं म्हणुन त्याला जमिनीत गाडुन टाकले आणि त्याच्याकडुन होत असणारा संहार थांबवला. आणि अश्याप्रकारे श्री गणेशाने दुरासद राक्षसापासुन काशीचे रक्षण केले आणि अंतर्धान झाले. भगवान शंकरांनी मग तिथेच श्री गणेशाची एक स्वयंभु मूर्ती निर्माण करुन त्याला "ढुंढिराज गणेश" असे नामकरण केले.
।। ॐ गं गणपतये नमः ।।

No comments:

Post a Comment