Sunday 26 August 2012


सवय

एकदा एक माणूस कोकिळेला म्हणाला - तू इतकी काळी नसतीस तर किती बर झाल असतं. समुद्राला म्हणाला तुझ पाणी खारट नसते तर किती बर झाल असतं. गुलाबाला म्हणाला तुला काटे नसते तर किती बर झाल असतं. तेव्हा ते तिघे एकदम म्हणाले , "अरे माणसा, तुझ्याकडे दुसऱ्याच खुसपट काढण्याची सवय नसती तर किती बर झाल असतं."

खरच, दुसऱ्याचे दोष काढण्याचे जर माणसाने बंद केले तर, आपल्या जीवनातील सर्वच कठीण प्रसंग आपल्याला टाळता येतील आणि प्रत्येकाचे जीवन कसे एकदम सुखमय आणि आनंदी होईल. अर्थात, अध्यात्मात हेच तर सांगितले आहे कि, "साधनेत तुम्हाला खरीच जर प्रगती करावयाची आहे तर, परनिंदा, परधन आणि परस्त्री यांचा सर्व प्रथम त्याग करा." 

७) श्री नवश्या गणपती, आनंदवल्ली, नाशिक. (Shree Navashya Ganapati, Aanandvalli, Nashik):-
श्री नवश्या गणपती मंदिर हे नाशिकमधिल आनंदवल्ली येथे गाणगापुर-सोमेश्वर मार्गावर आहे. ह्या मंदिराचा इतिहास सुमारे ३०० ते ४०० वर्षांचा आहे. पेशवे काळामध्ये हे मंदिर बांधले गेले असुन अत्यंत जागृत असे हे देवस्थान आहे. श्री नवश्या गणपती हा नवसाला  पावतो असा अनुभव येथील हजारो भाविकांना आलेला आहे.

इ.स. १७७४ मध्ये फाल्गुन महिन्यात श्री राघोबा दादा आणि त्यांची पत्नी आनंदिबाई ह्यांनी ह्या मंदिराची स्थापना केली होती. आनंदवल्ली हे गाव श्रीमंत माधवराव पेशवे यांचे आजोळ. त्यांच्या मातोश्री गोपिकाबाई श्री नवश्या गणपतीच्या निस्सिम भक्त होत्या. राघोबा दादा आणि आनंदिबाई ह्यांना १५ ऑगस्ट १७६४ रोजी मुलगा झाला त्याचे नाव विनायक असे ठेवण्यात आले. मुलाच्या जन्मप्रित्यर्थ ह्या गावाचे पुर्वीचे नाव बदलुन आनंदवल्ली असे ठेवण्यात आले. त्याच दरम्यान श्री नवश्या गणपती मंदिराची पण उभारणी करण्यात आली.

गोदावरी नदिच्या तिरावर असलेले हे मंदिर पुर्वाभिमुख असुन मंदिरात प्रसन्न अशी श्री गणरायाची मूर्ती आहे. मूर्तीचे डोळे अतिशय सजिव भासत असुन मूर्तीदेखिल अतिशय आकर्षक आहे. डाव्या सोंडेच्या गणरायाच्या एका हातात पाश, दुसऱ्या हातात फुल, तिसऱ्या हातात मोदक आणि एक हात सतत भक्तांना आशिर्वादाचा प्रसाद देत असतो. प्रत्येक हातात एक कडं असुन डोक्यावर मुकुट आहे. अशी हि आकर्षक मूर्ती, जिच्यावरुन भक्तांची नजरच हटत नाहि.

राघोबा दादांनी आनंदवल्लीत एक मोठा राजवाडा देखिल बांधला होता. ह्या राजवाड्याच्या पश्चिमेस (पाठिमागे) उभे राहिल्यास श्री नवश्या गणपतीचे दर्शन होत असे. सन १८१८ साली इंग्रजांनी पेशवाई बुडवली आणि राजवाडादेखिल जाळला. मात्र परिसरातील मंदिरे शाबुत राहिली. श्री नवश्या गणपती मंदिर हे पेशव्यांच्या कारकिर्दिची साक्ष देत आजहि दिमाखाने उभे आहे. ।। ॐ गं गणपतये नमः ।।

No comments:

Post a Comment