Tuesday 21 August 2012

मुक्तविहार



गेल्या दोन-तीन वर्षात आमच्या जवळच्या आणि दूरच्या कुटुंबात बऱ्याच जणांना पुत्र लाभाचा आशीर्वाद मिळाला. इतकी पुत्र रत्न झाली कि माझी मोठी लेक मजेत सर्वाना म्हणायची, "चला तर, आपण आपली एक IPL टीम तयार करूया आता." सर्व जण एकदम खुशीत आहेत. आपापली मुलं जस जशी मोठी होत आहेत तसं तसे आईबाप त्यांचे फोटो एकतर फेसबुकवर अपलोड करतात नाहीतर वेळ मिळाल्यास आपल्या जवळच्या लोकांना email  ने पाठवतात. त्यांच्या मुलांची होणारी बौद्धिक आणि शारीरिक वाढ पाहून खूप आनंद होतो. ह्या सर्व मुलांचे ते निरागस हास्याचे फोटो पाहून नेहमीच समाधान वाटते. बरेच वेळा आम्ही ह्यावर चर्चा सुद्धा करतो. मनाला, त्या मुलांच्या निरागस हसण्याचा, कित्येकदा हेवा सुद्धा वाटतो. वाटते, का आपल्याला सुद्धा मोठे झाल्यावर त्यांच्यासारखे सदैव आनंदतात राहता येत नाहीं. ह्या विचाराबरोबरच असेही लक्षात आले, 'सत्चिदानंद' अवस्तेत असलेली ही लहानपणातली (३-४ वर्षापर्यंत ) मुले मोठी झाल्यावर स्वतःचा हा भोळे-भाबडेपणा , निरागस मन, सदैव आनंदी राहण्याची वृत्ती ....कुठे हरवून बसतात? कुठली जादूची काठी त्यांच्यात हा बदल घडवून आणते? कोणाला म्हणून ह्या त्यांचातल्या बदलावाला जवाबदार ठरवायचे? ह्यावर विचार करत असतांना, परवा एक सुरेख लेख माझ्या वाचनात आला. लगेच वाटले, अरेच्च्या, आपल्या सारखे बरेच जण विचार करतात. पर्यंतू, हा 'बदलाव घडवून न आणण्यासाठी' आपण काहीच करू शकत नाहीं , ह्याची मनाला हुरहूर लागून राहिली आहे. इतकेच नव्हे तर, आपण सुद्धा अशा प्रकारच्या 'सत्चिदानंद' अवस्थेत,  प्रयन्त करूनसुद्धा फार वेळ  राहू शकत नाहीं ह्या गोष्टीची मनाला खंत वाटते आहे. वाचलेला लेख खालील प्रमाणे :-

कुठून येतं ते हास्य ... काय असेल त्या पाठीमागच रहस्य ??

डोक्यावर ओझं .... अंगावर फाटके कपडे .... पण चेहऱ्यावर अगदी मनसोक्त अन दिलखुलास हास्य ...
कुठून येतं ते हास्य ... काय असेल त्या पाठीमागच रहस्य ??

साधं-सरळ उत्तर .... हे हास्य त्यांच्या लहानपणाच ... त्यांच्या निरागसतेच ...
अन त्यांच्या अज्ञानाच .... हो हो अज्ञानाच !!!...

नंतर त्यांच्या वाट्याला शिक्षण येत ... आणि जसं जसं ते शिकायला लागतात ते निरागसत्व हरवत जातात ...
त्यांना शिकवणारे कोण ?? तर आपणंच ...

दुसऱ्याच ओझं वाहण म्हणजे 'चूक' ... आपला पहिला धडा ...
चारित्र्य अन विचारांची दिशा जरी फाटकी असली तरी चालेल पण 'सभ्य' समाजात जगायचं असेल तर कपडे फाटके नकोत ...
आपल्याला काय वाटतं हे महत्वाच नाही ... 'समाज' काय मान्य करतो हे जास्त महत्वाच ...
अन ह्या आपल्या शिकवण्याला आपण 'व्यवहारज्ञान' म्हणायचं ???

मार्क्स, टक्केवारी, नंबर यांच्या शर्यतीत त्यांना उगीच धावायला लावून, आकलन शक्ती, नवीन गोष्टी जाणून घेण्यातल कुतूहल, प्रयोगशीलता असल्या गुणांकडे थेट दुर्लक्ष्य करायचं ...

शिक्षणात नवीन पंख फुटलेल्या पक्ष्यांना विश्वासाची अन स्वप्नांची पंख देण्याची ताकद असावी ...
त्या मुक्त प्राण्यांना मुक्तच राहू द्यावं ... मुक्तविहार करणारे पक्षीच गगनभरारी घेऊ शकतात !!!

आपल्या पोकळ विचारांच्या जाळ्यात त्या निरागस जीवांना कोंडून ठेवण्यात काहीच अर्थ नाही ....
कारण पिंजऱ्यात कोंडून ठेवलेले प्राणीच पुढे जास्त आक्रमक होतात !!!!


किती छान लिहिले आहे यात !! ह्याचा सरळ अर्थ मग असा होतो काय....कि ह्या इवल्या इवल्या गोंडस बाळांच बालपण हरवण्यास आपणंच कारणीभूत आहोत काय?!!!

३) जागृत गणपती - गणेशगुळेचा गणपती : -
 (Ganeshgule Ganapati, Ratnagiri, Maharashtra)
रत्नागिरी जिल्ह्यात गणेशगुळे गावापासून केवळ एकच किलोमीटर अंतरावर एका उंच डोंगरावर गणपतीचे पुरातन मंदिर आहे. हे मंदिर पांडवांनी बांधले असल्याचे सांगितले जाते. पावसपासून हे गाव जेमतेम चार किमी अंतरावर आहे. पूर्वी या मंदिराच्या गाभा-यात गणपती होता. मात्र नंतर तो गणपती मंदिर सोडून गणपतीपुळे येथे गेल्याची आख्यायिका आहे. सध्या या गाभाऱ्याच्या दरवाजाला आतून शिळा आहे. त्यामुळे गाभा-यात प्रवेश करता येत नाही. दरवाजा पूर्ण बंद असल्यामुळे आत काय आहे, हे समजू शकत नाही. दरवाजापेक्षा मोठी शिळा गाभाऱ्यात कशी गेली, याचे आश्चर्य भाविकांना सुद्धा वाटते. त्यामुळे गणेशाच्याच मर्जीमुळे ती शिळा आत गेल्याचे मानून भाविक शिळेपुढेच नतमस्तक होतात. गणपती नसला तरीही त्याच्या स्पर्शाने पावन झालेली ही शिळादेखील नवसाला पावते, असे मानले जाते. येथे दरवर्षी माघी गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. गावातून पालखी काढली जाते. वेगवेगळे मंनेरंजनाचे कार्यक्रम देखील गणेशोत्सवा दरम्यान सादर होतात. मंदिरालगत एक विहीर आहे. आणि ती विहीर कधीच आटत नाही किंवा पावसाळ्यात विहिरीतील पाण्याची पातळी वाढत सुद्धा नाही.
।। ॐ गं गणपतये नमः ।।

No comments:

Post a Comment