Monday 20 August 2012


कटू सत्य 

इंसान भी क्या चीज हैं !
दौलत कमाने के लिये सेहत खो देता हैं,
सेहत को वापस पाने के लिये दौलत खो देता हैं, 
जीता ऐसा हैं, जैसे कभी मरेगा ही नहीं और मर ऐसे जाता हैं, जैसे कभी जिया ही नहीं !!

खरोखर किती गूढ अर्थ आहे ह्या कटू सत्यतेत !! आपल्याला सगळ कळत पण वळत काहीच नाहीं. असल्या सगळ्या सुविचारांना, आपण अगदी बेमालून पणे होकारार्थी मान  डोलावतो आणि नंतर "ये रे माझ्या मागल्या" ह्याला शोभेल असे वर्तवणूक करून पुन्हा आपल्याच नशेत मग्न होवून ह्या बेजवाबदार अशा स्पर्धात्मक आणि धावपळीच्या आयुष्यात मन गुंतवून "आम्ही एकदम मजेत आहोत बघा" असे नाटकी हसू चेहऱ्यावर आणून पावूल पुढे टाकण्याचा उगीचच प्रयन्त करतो. 


श्रावण महिना संपताच सर्व श्री गणेश भक्तांना वेध लागतात ते लाडक्या श्री गणेशाचे आगमन होण्याचे. परंतु ह्या वर्षी अधिक भाद्रपद महिना असल्यामुळे अजुन तरी आपल्याला वाट बघावी लागणार आहे. आणि त्यासाठिच प्रत्येकाला निज भाद्रपद सुरु होईपर्यंत दर दिवशी किमान एका जागृत गणपतीचे दर्शन घडवण्याचं वचन देऊन आज मी तुम्हाला महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात घेऊन जाणार आहे. तेथील श्री भृशुंड गणेश आणि त्याबद्दलची उपलब्ध सविस्तर माहिती आपल्या साठि घेऊन आलो आहे. चला तर मग. (सौजन्य :श्री सिद्धीविनायक गणपती, मुंबई ) 

BHRUSHUND GANESH , Bhandara -Maharashtra. 

भृशुंड गणेश : -  भंडा-याचा भृशुंड गणेश हा तेथील प्रतिमेच्या प्राचिनतेमुळे तसेच भव्यतेमुळे ग्रामवासी जनतेचे श्रध्दा स्थान आहे. भृशुंड गणेश मूर्तीत जणू ऋषींचा भास होतो. अखंड रक्ताश्म शीळेवर कोरलेली ही मूर्ती गाभा-यात तळापासून आठ फूट उंच व चार फूट रूंद आहे. पूर्ण सिंदूर चर्चित मूर्ती चतुर्भूज असून मूशकारूढ आहे. उजवा पाय खाली सोडलेला व डाव्या पायाची मांडी घातलेली मूर्ती आहे. चारही हातांमध्ये पाश, अंकूश, मोदक असून उजवा वरद हस्त आहे. शिरोभागी पंचमुखी शेषफणा आहे. मुखमंडळाचे जागी नाकपुडया, डोळे, मिशा व दाढी दिसत असून चेहरा भव्य व स्पष्ट आहे. सोंड डाव्या हातावरील मोदकाकडे वळलेली आहे. भृशुंड गणेशाचं मंदीर हेमाडपंथी आहे. मूर्तीची स्थापना ११३० मध्ये झाली असावी असा अंदाज आहे. तसे मेंढा परिसरात गिरीवंशीय गोसावी लोकांच्या समाधी समूहाचा एक भाग आहे. आजही या भागात हेमाडपंथी शैलीतील स्मारके बघायला मिळतात. तसेच कित्येक वर्ष हे भृशुंड गणेशाचे मंदीर दुर्लक्षीत होते. परंतू भंडारा येथील ग्रामजोशी श्री विश्वासराव जोशी यांचे पुढाकाराने १९८६ पासून तिथे पूजा सुरू केली गेली. आज मंदीराची भव्यता वाढली असून सभामंडप भव्य व सुंदर परिसर गणेश भक्तांना आध्यात्मिक सुख देण्यात हातभार लावत आहे. भृशुंड गणेशमेंढा - परिसरातील ग्रामवासियांनी पुढाकाराने साकारलेली एक वस्तू असून त्यांच्याच सहकार्याने विविध कार्यक्रमांची रेलचेल वर्षभर असते. आज दर चतुर्थीला अभिषेक व महापूजा असते. गणेशोत्सवाचा दहा दिवस कार्यक्रम चालतो. आणि पौष संकष्ट चतुर्थी ते माघ चतुर्थी पर्यंत एक महिनाभर कार्यक्रम असतो. पूजापाठात ग्रामस्थ हिरिरीने सहभागी होवून कार्यक्रम व उत्सव थाटात पार पाडतात. संस्कारक्षम वातावरण निर्मीतीसाठी ग्रामीण महिलांना गणपती अथर्वशिर्ष शिकविण्यात आले. त्यामुळे आवर्तनाभिषेकात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असतो. या देवस्थानाला आजवर अनेक संतमहंतांनी भेटी दिल्यात श्रृंगेरी पिठाचे जगद्गुरू शंकराचार्य प. पू. श्री भारतीतीर्थ हे एक होत. नुकतीच बडोद्याचे प. पू. श्री. जनार्दनस्वामी खेर यांनी सुध्दा भृशुंड गणेशाचे दर्शन घेतले. याच मंदीर परीसरात श्री. महावीर हनुमानाची मूर्ती सुध्दा आहे. परंतू त्यावर मंदीर अथवा छत नाही हे विशेष.
भाविकांची मनोरथे पूर्ण करणा-या श्री. भृशुंड गणेशाची आरती त्याची महती गाणारीच आहे.

आरती श्री गणेशा, देवा मंगळमूर्ती, नामले रामस्वामी, वेद वर्णिती कीर्ती ॥१॥
भृशुंड ॠषीवर दे तुला प्रसन्न केले, दिधले ते निज स्वरूपा अपूले ॥२॥
नादा: बिंदू सुधा न भी कर्पुरा देते, तिन्हींचा संगम झाला, प्रभू नांदसी तेथे ॥३॥
कामना पूर्ण होती, तुझे दर्शने देवा, गोसाची नंदन तुझे चरणी सेवा ॥४॥ आरती श्री गणेशा ॥

श्री भृशुंड ॠषींनी वैनगंगेच्या तीरावर वटवृक्षाखाली तपश्चर्या करून या क्षेत्राला पावन केले आहे. गणेश व मुदगल पुरांणांतून भृशुंड गणेशाचे आख्यान दिलेले आहे. अशा या पावन भृशुंड गणेश मंदीरातून प्रज्वलीत झालेली संस्काराची ज्योत समाजाच्या तळागळापर्यंत जावून सामाजिक एकात्मतेची बंधूभावाची एक अखंड महाज्योत व्हावी अशी प्रार्थना श्री भृशुंड गणेशाचे चरणी करूया.
।। ॐ गं गणपतये नमः ।।

No comments:

Post a Comment