Monday 20 August 2012


 First impression 

लहानपणी शाळेत असताना, वर्गात शिक्षक नेहमी सांगायचे, "अरे, मुलानो, केव्हाही लक्षात ठेवा, नवीन वर्गात गेला कि पहिला पेपर / परीक्षा उत्तम प्रकारे लिहा आणि चांगले मार्क्स मिळावा कारण 'First impression is the Last impression'." बागडत  बागडत अभ्यास करण्याच्या त्या दिवसात, ह्याचे महत्व फारसे कधी कळलेच नाहीं. एवढेच काय, वयाच्या ४५ वर्षापर्यंत सुद्धा हे असे का म्हणतात, हे आककले नव्हते. ह्यासाठी संदर्भ असा ...लहानपणी आणि अगदी लग्न झाल्यानंतर सुद्धा बरेच वर्षे , मी स्वभावाने रागीट, कडक, लहरी, शिस्त प्रेमी, वचक दाखवणारी, धारदार जिभेची वगैरे वगैरे अशी होते. (खरे म्हणजे बालपणी आई-वडिलांनी आणि लग्नानंतर नवऱ्याने केलेल्या लाडामुळे मी एक बिघडलेली मुलगी / बायको होते.) मनातून जरी प्रेमळ आणि मऊ असले तरी , लोकांना आठवणीत फक्त माझा राठ स्वभावाच जास्त लक्षात राहावयाचा. आयुष्यात नंतर, बऱ्याच घडामोडीनंतर आणि देवाच्या कृपेने आणि नवऱ्याच्या सत्संगतीत राहून , उशिरा  का होईना , माझ्या स्वभावात बदल घडून आला. नवीन पीढीच्या माझ्या लेकीनी आणि जुने संस्कार जोपासलेल्या माझ्या आईने, मला हा बदल घडवून आणण्यात मदत केली हे मी कसे विसरू शकेन. मला भेटलेले सर्व जण माझ्यात झालेल्या ह्या बदलाची मला जाणीव सुद्धा करून देतात. पण गम्मत अशी आहे कि, अजूनही माझ्या दोन मुलींपैकी जर कोणी रागारागाने त्रागा करून घेतला तर झटदिशी म्हणतात , "अगदी आईसारखी रागीट आहे !!"..... 'First impression is Last impression', ह्याचा अर्थ आत्ता कुठे माझ्या लक्षात येतो आहे !!!    

दुसरे जागृत गणपतीचे स्थान : 

2) रणथम्भोर दुर्ग मधील श्री गणेश, राजस्थान : - (Shree Ganesh from Ranthambhore Fort, Rajasthan) 

रणथम्भोर, राजस्थान मधील रणथम्भोर किल्यावरील असलेलं हे श्री गणेशाचं सुंदर रुप. ह्या श्री गणेशाचे विशेष म्हणजे हे त्रिनेत्र गणेश आहेत. रणथम्भोर परिसरातील जन मानसात ह्या श्री गणेशाची प्रचिती अगदि खुप. ती अशी कि, घरात कुणाचं लग्न असो अथवा कुठलाहि महत्वाचा सण जसं होळी, दिवाळी. ह्या महत्वाच्या प्रसंगी सर्व प्रथम रणथम्भोर किल्यामधील श्री गणेशाला आमंत्रण दिलं जातं. आमंत्रण प्रत्यक्ष जाऊन किंवा पत्राने आमंत्रण दिलं जातं. काहि भक्तगण आपली सुखःदुखे सुद्धा ह्या श्री गणेशाला पत्राने कळवतात. आणि भक्ताने पाठवलेली सर्व पत्रे ह्या मंदिरात अगदि आवर्जुन पोहचवली जातात. त्यातुनहि महत्वाची गोष्ट म्हणजे, गणपती मंदिरात आलेली भक्तांची सर्व पत्रे मंदिरातील पुजारी श्री गणरायाला ऐकवुन दाखवतात. भक्तगणांच्या प्रत्येक पत्रामधील शब्दन् शब्द श्री गणरायापर्यंत पोहचतो. श्री गणरायाच्या दरबारात होणारी अशी हि एकमेव सेवा असावी कदाचीत. पत्र पाठवण्यासाठि पत्तासुद्धा अगदि सोपा आहे. “श्री गणेशजी महाराज, पोस्ट – रणथम्भोर” . केवळ एवढ्याश्या पत्त्यावर पत्र पोहचतं सुद्धा आणि आपला संदेश श्री गणरायाच्या कानावर जातो सुद्धा. मग काय तुम्हि कधी पाठवणार पत्र श्री गणराया साठि................. ।। ॐ गं गणपतये नमः ।।

No comments:

Post a Comment