Saturday 25 August 2012


घंटा...


आपण कधीही मंदिरात प्रवेश केल्यावर प्रथम घंटा वाजवतो. यामागे शास्त्र आहे. घंटा वाजवून आपण देवाचं आपल्याकडे लक्ष तर वेधून घेतोच, पण घंटा वाजवल्यामुळे वातावरणात सकारात्मक कंपनं निर्माण होतात. या कंपनांचा आपल्या शरीरावरही सकारात्मक परिणाम होतो. घंटेच्या आवाजामुळे आपल्या आसपासच्या नकारात्मक शक्ती दुर्बल होऊन नष्ट होतात. आपली एकाग्रता वाढवतात.

मंदिरात घंटा वाजवून आपण आपल्यालाच भानावर आणत असतो. घंटानाद केल्यामुळे आपल्या मनात चालू असलेल्या इतर विचारांना विराम मिळतो आणि इतर विचार थांबतात. समोरील देवाच्या मूर्तीवर आपण चित्त एकाग्र करू शकतो. ज्या मंदिरात घंटानाद सतत चालू राहातो, ते देवस्थान जागृत देवस्थान बनते. कारण येथील देव घंटानादामुळे सतत जागा राहातो.

प्राचीन काळापासून घंटा वाजवण्याची पद्धत रुढ आहे. घरातही देवांची पूजा करताना आपण घंटानाद करतो. पूजेमध्येही घंटेला विशेष स्थान असतं. घंटा वाजवल्याने पापक्षालन होत अशल्याचं पुराणांमध्ये सांगितलं आहे. घंटा वाजवल्या जो ध्वनी येतो, तो ऊँकाराच्या नादाशी साधर्म्य साधणारा आहे. सृष्टी निर्माण होताना हाच नाद घुमला होता. त्याच ध्वनीचं घंटानाद हा रुपक मानलं जातं. (सौजन्य - आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात)  

श्री शमी विघ्नेश, नागपुर : - (Shree Shami Vighnesh, Nagpur) : -
एके दिवशी इंद्र देवाने ब्रह्मादेवांना विनंती केली ती एका सुंदर स्त्रीची निर्मिती करण्यासाठि. इंद्रदेवाच्या विनंतीवरुन ब्रह्मदेवांनी आपल्या मंत्रसहाय्याने एका सुंदर स्त्रीची निर्मिती केली आणि तीचे नाव तिलोत्तमा असे ठेवले. तिलोत्तमा हि दिसायला अतिशय सुंदर, गोरी पान आणि निळ्या डोळ्यांची होती. तिला पाहताच इंद्रदेवाला तिच्याविषयी अतिशय आकर्षण वाटु लागले. तिला पाहताच तो तिच्या प्रेमात पडला. आणि त्यातुनच इंद्रदेवाची संपुर्ण शक्ती हि तीन भागांमध्ये विभागली जाऊन त्यापासुन तीन राक्षस निर्माण झाले- महापाप, संकट आणि शत्रु. ह्या तीनहि राक्षसांनी मग भगवान शंकराची उपासना करुन, त्यांना प्रसन्न करुन आशिर्वाद स्वरुपात अनुक्रमे स्वर्गलोक, पृथ्वीलोक आणि पाताळलोकात अधिकार मिळवला. भगवान शंकरांकडुन शक्ती प्राप्त होताच तीनहि राक्षसांनी सर्वत्र धुमाकुळ माजवला, तीनहि लोकांमध्ये त्यांनी लोकांना त्रास देणं सुरु केलं. त्यांच्या त्रासापासुन वाचण्यासाठि लोकांनी मग मुद्गल ऋषिंच्या मार्गदर्शनाखाली श्री गणेशाची उपासना सुरु केली. त्याअगोदर मुद्गल ऋषिंच्या विनंतीवरुन भगवान शंकर आणि माता पार्वती ह्यांनी एकत्रीत पणे शमी वृक्षाचे रुप धारण केले. मग मुद्गल ऋषिंनी सर्व लोकांना पाचारण करुन शमी वृक्षाखाली बसुन श्री गणेशाची उपासना सुरु करण्यास सांगितले. श्री गणेशाचा अखंड मंत्रजप आणि प्रार्थना ऐकुन भगवान श्री गणेश प्रसन्न होऊन तिथे अवतरीत झाले. श्री गणेशाने मग त्या तीन राक्षसांचा वध केला आणि शमी वृक्षात सामावुन गेले. संकट आणि विघ्न यातुन सुटका झालेले सर्व भक्तगण मग “जय श्री शमी विघ्नेश” असा जयघोष करु लागले. त्यानंतर तेथे प्रकट झालेल्या श्री मूर्तीचे नामकरण सुद्धा श्री शमी विघ्नेश असेच करण्यात आले. श्री शमी विघ्नेशाची मूर्ती पाषाणी असुन भव्य - दिव्य आणि उजव्या सोंडेची आहे. मूर्ती अतिशय सुंदर असुन भक्तांचे संकट हरणारी अशी आहे. ।। ॐ गं गणपतये नमः ।।

No comments:

Post a Comment