Sunday 26 August 2012


प्राजक्ताची फुलें

प्राजक्ताची नाजुक फूलं 
काही क्षणासाठीच फुलतात
हक्काची डहाळी सोडून
इतरांच्या अंगणी पडतात... 

वाचल्यावर वाटल, आम्हा स्त्रियांचं जीवनही असंच असते का ? वयाच्या २५ वर्षापर्यंत आई-वडिलांच्या मायेच्या उबेखाली वाढायचं आणि एक दिवशी अचानक आपल म्हणून जे जे काही आहे ते सर्व सोडून ओलावलेल्या डोळ्यांच्या कडा लपवून दुसऱ्याच्या घरात पदार्पण करायचं आणि अगदी त्याच दिवसापासून , जे जे काही नवीन असतं त्याला आपलंस करून बायको, मैत्रीण, सून, भावजय, नणंद, आई...अशा अनेक प्रकारच्या भूमिका सफाईत पणे हसत खेळत निभावून न्यायच्या. मनात फक्त एकाच गोष्टीचा ध्यास...तो म्हणजे, मी सर्वाना सदैव सुखी ठेवले पाहिजे. 

६) लक्षविनायक, औरंगाबाद, महाराष्ट्र, भारत (Lakshya Vinayak, Aurangabad, India) :-
तारकासुर नावाचा राक्षस देवतांना आणि ऋषिमुनींना सतत त्रास देत होता. त्यांच्या प्रत्येक शुभ कार्यामध्ये विघ्न आणत होता. त्यामुळे ऋषिमुनींचे तप आणि यज्ञासारखी शुभ कामे कधीहि पूर्ण होत नसत. त्यावेळेस नारदमुनी कार्तिकेय कडे आले. नारदमुनींनी तारकासुराचा चाललेला सर्व अघोरी प्रकार कार्तिकेयना कथन केला. नारदमुनींनी सांगितलेला सर्व प्रकार ऐकुन रागाने लालबुंद झालेले कार्तिकेय आपले आई-वडिल शिव-पार्वती यांच्याकडे येऊन त्यांचा आशिर्वाद घेतला आणि लगेचच तारकासुराचा वध करण्यासाठि प्रस्थान केले. परंतु कार्तिकेयनी सोडलेल्या कुठल्याहि अस्त्राचा तारकासुर राक्षसावर काहिहि परिणाम होत नव्हता. प्रत्येक अस्त्र निष्फळ ठरत होतं. त्यामुळे नाराज होउन कार्तिकेय परत आले. राक्षसाला वध करुन संपवण्यात अपयश आल्यामुळे कार्तिकेय आपले पिता भगवान शंकरांकडे त्यांचे मार्गदर्शन घेण्यास आले. भगवान शंकरांनी तेव्हा त्याला त्याची एक छोटिशी चुक सांगितली कि, बाळा कार्तिकेय युद्धभुमीवर जाण्याअगोदर तु ॐ कार गणेशाची प्रार्थना केली नाहिस. तेव्हा तु आता पवित्र अश्या घृष्णेश्वर येथे जाऊन ॐ कार गणेशाचा मंत्रजाप कर, त्याची पूजा कर. आणि मग बघ.

कार्तिकेय म्हणजेच बाळ स्कंद खुप खुष झाला आणि पित्याच्या आज्ञेनुसार त्वरीतच घृष्णेश्वरला जाऊन त्याने तब्बल एक लक्ष (एक लाख) वेळा ॐ कार गणेशाचा मंत्र जपला. श्री गणेश प्रसन्न होऊन लगेचच कार्तिकेयच्या समोर अवतरीत झाले. श्री गणेशाने मग कार्तिकेय जवळ असलेल्या बाणाला पवित्र स्पर्श केला. तसेच कार्तिकेयसाठि वाहन स्वरुपात मोर सुद्धा भेट म्हणुन दिला. कार्तिकेय लगेच मोरावर बसुन तारकासुराचा वध करण्यास निघाला. श्री गणेशाने स्पर्श केलेला बाण कार्तिकेयने तारकासुरावर सोडला आणि त्यातच तारकासुर मारला गेला. तारकासुराच्या वधामुळे सर्व देवतांमध्ये आणि ऋषिमुनींमध्ये प्रसन्नता पसरली. सारेजण तारकासुराच्या त्रासातुन मुक्त झाले होते. ॐ काररुपी श्री गणेश हे एक लक्ष जपनाम केल्यामुळे प्रसन्न झाले होते. म्हणुन श्री गणेशाला लक्षविनायक असेहि नाव पडले. औरंगाबाद, महाराष्ट्र येथे स्थित असलेल्या स्वयंभु श्री लक्षविनायकाची शेंदुर लेपित मूर्ती डाव्या सोंडेची असुन चार हात आणि अर्धमांडि घालुन बसलेली अशी आहे. अतिशय प्रसन्न वाटणारी श्री लक्षविनायकाची मूर्ती अखंड जप करणार्या सर्व भक्तांचे कल्याण करते. ।। ॐ गं गणपतये नमः ।।

No comments:

Post a Comment