Monday 27 August 2012


विनोदी माणस


दुबईमध्ये, आमच्या बिल्डींगमध्ये आमच्याच वयाचे एक जोडप आमच्याच मजल्यावर राहत. एकदम खुशाल नवरा-बायको आहेत. बुवांनी तर आमचे मन पहिल्याच भेटीत जिंकून घेतलं. ते इतके विनोदी बोलतात कि , त्याचं बोलणं ऐकल्यानंतर आम्ही इतके हसतो कि आमचे गाल, तोंड सर्व काही दुखायला लागत. पहिल्याच भेटीत त्यांनी आम्हाला सांगितले, "दुबई में नये आये हो? अभी आप को हर वक्त गेस्ट को वेलकम करने के लिये तैयार रहना पडेगा. ऐसा हैं कि, इंडिया में दो चीजे करनी बहुत जरुरी हैं, एक- गंगा स्नान और दुसरी-दुबई कि ट्रीप. ये दो चीजे नही कि तो हम स्वर्ग में नही जा सकते ." दुसऱ्यांदा भेटले तेव्हा म्हणाले , "कैसा हैं आपका बैल और गाव ? आज कल बैल और गाव दोनो भी देखने को भी नही मिलते. " माझ्या नवऱ्याला ते काय विचारात आहेत हे पटकन कळाले नाहीं. पण नंतर लक्षात आले कि, त्यांना  पहिल्या भेटीत सांगितले होते कि आम्ही बेळगावचे म्हणून!! ते त्यांनी विनोदी भाषेत विचारले,  "कैसा हैं आपका बैल और गाव (बेळ - गाव)?"  नंतर आनंद नी त्यांना विचारले,"आपका खाना हुवा?" त्यावर त्यांचे उत्तर इतके हल्लीच्या परिस्थितीला अनुसरून होते कि त्यांच्या बुद्धीचे कौतुक करावे तितके कमी. ते म्हणाले, " पहिले के जमाने में घरमे पकाते थे और शौचालय के लिये बाहर जाते थे. आज कल, खाना बाहर खाते हैं और शौचालय के लिये घर आते हैं. आज कल घरमे कोई किधर पकाता हैं? " त्यांना म्हंटल, "आप आपके पत्नी के साथ कभी हमारे घर आइये." त्यावर त्याचं उत्तर ..."मीडल इस्ट में दो चीजोका कभी कोई भरवसा नही कर सकते. एक, इधरका हवामान और दुसरा, मेरे पत्नी का मूड. तो उसको आपके घर लेके आने का मैं कोई आश्वासन नही दे सकता." एक क्षण असे वाटले कि, ह्यांची भेट आपल्याला दररोज झाली तर काय मस्त मजा येईल. खरच "विनोदी स्वभाव " ही एक देवानी दिलेली देणगीच आहे. ती सर्वांच्या कडे नसते. खूप थोडया भाग्यशाली लोकांनाच हा वर देव देतो. असे लोक आपल्याला भेटतात हे सुद्धा आपले भाग्यच समजायला पाहिजे. नाहीतर, ह्या स्वार्थी दुनियेत जिथे माणूस वेड्यासारखा विषयामागे धावतो आहे तिथे त्याला दुसऱ्यांना हसवण्यास वेळ कुठे आहे?  

९) श्री आशापुरक गणेश, बीड-महाराष्ट्र : - (Shree Aashapurak Ganesh, Beed-Maharashtra.)
नंदक नावाच्या एका नगरात “ दुष्ट ” नावाचा मच्छिमार रहात होता. स्वतःच्या नावाप्रमाणेच त्याचा स्वभाव होता. गावातील सगळ्यांना त्रास देणं आणि त्यांच्याकडुन खंडणी वसुल करणं हे त्याचं दरदिवशीचं काम. शेवटि मग गावातील सगळ्या जणांनी एकत्रीत येऊन एकजुटिने त्याला गावाबाहेर हाकलुन दिलं. मग तो दुष्ट त्यानंतर दुसर्या गावात गेला आणि तिथे सुद्धा त्याने तीच वाईट कामे सुरु केली. एकदा तो जंगलात शिकारीला जात असताना चिखलाने भरलेल्या खड्यात पडला. म्हणुन अंगावरील चिखल साफ करण्यासाठि तो जवळच असेलल्या तलावात आंघोळीसाठि गेला. तेवढ्यातच जवळुनच जात असलेल्या मुद्गल ऋषिंवर त्याची द्रुष्टि पडली. मुद्गल ऋषि चालता चालता ॐ ॐ ॐ ॐ ॐ असा मंत्र जाप करत होते. मुद्गल ऋषिंना लुबाडण्याच्या हेतुने दुष्टाने त्यांच्यावर अस्त्र उचललं. पण त्याच क्षणी त्याच्या हातातील संपुर्ण शक्ती नाहिशी होउन हात सुन्न झाला. मग मुद्गल ऋषिंनी आपल्या मंत्र सहाय्याने त्याच्या अंगावरुन हात फिरवताच तो पुर्ववत झाला. दुष्टाला आपण केलेल्या कृतीबद्दल खुप वाईट वाटलं होतं. म्हणुन तो लगेचच मुद्गल ऋषिंच्या पायवर डोकं ठेऊन त्यांची माफि मागु लागला दयेची भिक मागु लागला.

मुद्गल ऋषिंनी मग त्याला एक सल्ला दिला. ते म्हणाले, तु काहि कमळाची फुले आणि दुर्वा गोळा करुन आण आणि श्री गणेशाची पुजाअर्चना सुरु कर त्यामुळे तु दोषमुक्त होशील. ऋषिंनी सांगितल्या प्रमाणे मग दुष्टाने फुले आणि दुर्वा गोळा करुन आणुन श्री गणेशाची पूजा करणं सुरु केलं. तो दिवस होता श्री गणेश चतुर्थी.

मग मुद्गल ऋषिंनी एक झाडाची सुकलेली फांदि त्याच्यासमोर ठेवली आणि दुष्टाला सांगितले कि, जो पर्यंत ह्या फांदिला पाने फुटत नाहित तो पर्यंत तु “ श्री गणेशाय नमः ” असा अखंड मंत्रजाप कर. असे सांगुन ऋषि तेथुन निघुन गेले.

मुद्गल ऋषिंच्या आज्ञेनुसार आणि आपल्या वरील सारे दोष नष्ट करण्याच्या हेतुने, तसेच श्री गणेशाची कृपाद्रुष्टि लाभावी ह्या आशेने मग दुष्टाने “ श्री गणेशाय नमः ”असा अखंड मंत्रजाप चालुच ठेवला. खुप दिवसांनंतर मुद्गल ऋषि परत त्या मार्गाने जात असताना त्यांना एक मातीचं वारुळ द्रुष्टिस पडलं आणि सोबतच त्यातुन मंत्रजापाचा आवाज देखिल ऐकु येत होता. आणि त्यांनी ठेवलेल्या सुक्या फांदिला पाने देखिल फुटलेली होती. ऋषिंनी मग हळुवारपणे त्या वारुळावरील वाळु बाजुला सारली आणि त्यांना द्रुष्टिस पडले कि दुष्ट श्री गणेशाच्या मंत्रजापात अगदि मंत्रमुग्ध होऊन गेला होता. मुद्गल ऋषिंनी मग आपल्या कमंडलुतील पवित्र पाणी त्यावर शिंपडुन त्याला जागं केलं. अखंड मंत्रजापानंतर दुष्टाच्या दोनहि भुवयांच्या मधुन एक सोंडेसारखा भाग आला होता. ते पाहुन मुद्गल ऋषिंनी दुष्टाचे नामकरण “ भृशुंडि ” असे केले.

भृशुंडिने मग तिथे श्री गणेशाच्या एका सुंदर मूर्तीची स्थापना केली. आणि आपण केलेल्या अखंड मंत्रजापानंतर श्री गणेशाची कृपाद्रुष्टि लाभुन आपली आशा पूर्ण झाली, म्हणुन त्या श्री गणेशाला त्याने नाव दिले, श्री आशापुरक गणेश.

महाराष्ट्रातील बीड पासुन साधारण १० किलोमीटर अंतरावर श्री आशापुरक गणेशाचे हे मंदिर आहे. मूर्तीचे रुप अतिशय सुंदर आणि मनमोहक आहे. चतुर्भुज आणि डाव्या सोंडेची मूर्ती पाहुन गणेशभक्तांना आपली आशा पुर्ण झाल्याचा आनंद मिळतो.
।। ॐ गं गणपतये नमः ।। 

No comments:

Post a Comment